श्रीकृष्ण जन्माष्टमीला करा मोरपंखाचा उपाय..

अध्यात्मिक माहिती

यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी 6 ऑगस्ट रोजी साजरा केली जाणार आहे, तसे तर भगवान श्री कृष्णाचे रूप घेतलं तर डोक्यावरती मुकुटात सदैव असलेलं मोरपंख डोळ्यासमोर येतं. ज्योतिष शास्त्र सोबतच वास्तुशास्त्रातही मोराच्या पंखांना विशेष महत्त्व दिले आहे. मोराच्या पंखाचे काही उपाय तुम्ही तर जन्माष्टमी निमित्तानं करू शकत असाल तर नक्की करावे.

त्यामुळे अनेक बाबतीत विशिष्ट फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं, असं सांगितलं जातं. चला तर मग जाणून घेऊया श्रीकृष्ण जन्माष्टमीला मोरपंखाचे संबंधित काही उपाय..हिंदू धर्मात अतिशय महत्व आहे ते मोरपंखाच. मोरपंख केवळ श्रीकृष्णांना प्रिय नाही तर माता सरस्वती, माता देवी लक्ष्मी, इंद्र देव आणि भगवान कार्तिकेय आणि श्री गणेश यांनादेखील प्रिय आहेत.

या सोबतच मोराचे पंख हे श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे, म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमी ज्योतिष शास्त्रानुसार सांगितलेले काही मोरपंखाचे संबंधित उपाय. यामध्ये मोरपंखाचा उपाय तुम्ही वास्तुदोष निवारणासाठी वाईट शक्ती पासून सुटका मिळविण्यासाठी किंवा जिद्दी मुले असतील तर त्यांची जिद्द कमी करण्यासाठी आणि मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा हा उपाय करून बघू शकता..

वास्तुदोष निवारण्यासाठी मोरपंखाचा काय उपाय करावा? तर घरात जर कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर 8 मोरपंख पांढरा धाग्याने बांधावी आणि ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे वास्तुदोष दूर होतात असं सांगितलं जातं. ही मोरपंख तुम्ही घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवू शकता.

याबरोबरच घराच्या मुख्य प्रवेश मोराचे पंख लावलेला घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही अशी मान्यता आहे.
त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर एक मोरपंख नक्की लावावे. याबरोबरच तुमच्या घरामध्ये अतिशय हट्टी मुलं असतील किंवा प्रत्येक गोष्टीसाठी मुलं हट्ट करत असतील तर त्या मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी मोराच्या पंखापासून बनलेल्या पंख्याने त्या मुलांना हवा घालावी किंवा आपल्या घरातील पंख्यावर ते मोरपंख चिकटावे.

यामुळेसुद्धा हट्टी मुलांचा हट्टीपणा कमी होण्यास मदत असं सांगितलं. शिवाय मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी सुद्धा मोरपंख अतिशय उपयुक्त ठरतं. तुमचं मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नसेल तर मुलांच्या पुस्तकात मोरपंख ठेवावे. हे कार्य मात्र तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करावे. त्यामुळे एकाग्रता वाढते, असं सांगितलं जातं. तर मोरपंख संबंधित हे उपाय तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीला नक्की करा आणि त्याचे अनुभव शेअर करायला विसरू नका…

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *