सुतक म्हणजे काय? सुतक पाळण्याचे नियम नक्की जाणून घ्या!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येक माणूस जन्माला आला म्हणजे त्याचा मृत्यू हा अटळ असतो. कोणाला अगदी सहजासहजी मृत्यू होतो तर बऱ्याच जणांना खूपच त्रास सहन करून मृत्यूला सामोरे जावे लागते. व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर आपण सुतक पाळत असतो. परंतु हे सुतक म्हणजे काय आणि सुतक पाळण्याचे नियम काय आहेत याविषयीची आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे.

ज्यावेळेस आपल्या घरातील एखादा व्यक्ती मरण पावतो त्या क्षणापासून आपल्याला सुतक चालू होते. मरण पावलेला व्यक्ती जर आपल्या नात्यातील असेल तर ते नाते किती जवळचे आहे. त्यानुसार सुतकाचे नियम अवलंबून असतात. तसेच आपल्या घरातील व्यक्ती जर बाहेरगावी असेल तर त्याच्या मृत्यूची वार्ता ज्या वेळेस आपल्याला समजेल त्या वेळेपासून आपल्याला सुतक चालू होते.

हिंदू धर्मात सुतक म्हणजे अशौच. म्हणजेच विटाळ मानला जातो. प्राचीन काळापासून व्यक्तीच्या निधणानंतर हिंदू धर्मात 1 ते 13 दिवस सुतक पाळले जाते.हे सूतक पाळत असताना आपल्याला काही नियमांचे पालन देखील करणे गरजेचे आहे. तर हे नियम कोणते आहे चला तर जाणून घेऊया.

सुतक पाळत असताना घरात कोणतेही मंगल कार्य करू नये. तसेच देवपूजा सुद्धा करू नये. तसेच दुसऱ्याच्या मंगल कार्यास जाऊ नये. सुतक असताना कुठल्याही मंदिरात दर्शनासाठी जाऊ नये. बाहेरूनच दर्शन घ्यावे. मृत व्यक्तीला ज्याने अग्नी दिला आहे त्याने दहा दिवस घराबाहेर पडू नये.

उदा नदी, शिव ओलांडू नये. सुतकामध्ये गादी, पलंग यावर न झोपता जमिनीवर झोपावे. दररोज अंघोळ केली तर चालेल पण कपाळाला गंध लावू नये. तसेच सुतका मध्ये नवीन वस्त्र घालू नये. तसेच अत्तर व सेंट यांचा वापर टाळावा. दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी. सुतका तील घरातील सर्व कपडे धुऊन टाकावे. घरात गोमूत्र शिंपडावे.

अकराव्या दिवशी कपाळाला गंध, कुंकू, टिकली लावावी. मरण पावलेल्या व्यक्तीचे दहावा अकरावा बारावा तेरावा हे विधी करावेत. म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास पुढील गती प्राप्त होते. चौदाव्या दिवशी घरात निधनशांत किंवा उदक शांती विधी करून मगच देव पूजा करावी. चौदाव्या दिवशी खांदेकरी, नातेवाईक यांना गोड भोजन करावे.

त्याच दिवशी संध्याकाळी अग्नी देणाऱ्याला खंद्यावर नवीन उपकरणे डोक्यात टोपी घालावी. त्यानंतर शंकराच्या मंदिरात जावे. गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी. म्हणून मंदिरात तुपाचे निरांजन लावावे. डोक्यावरील टोपी उपरणे मंदिरात तेथेच काढून ठेवावे. तर मित्रांनो तुम्ही देखील सुतक पाळताना या नियमांचे अवश्य पालन करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *