सुतकात पाळायचे काही नियम! जाणून घ्या

अध्यात्म माहिती

मित्रांनो प्रत्येक माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू असतोच. मग हा मृत्यू कोणत्याही कारणाने असो मृत्यू हा सर्वांनाच असतो. मृत्यू झाल्यानंतर मग आपल्या केलेल्या कर्मानुसार आपणाला नरकात किंवा स्वर्गात जागा मिळत असते. तर प्रत्येक माणूस मेल्यानंतर सुतक पाळणे हे हिंदू धर्मामध्ये एक प्रथा आहे.

म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यापासून सुतक हे चालू होते. तर सुतक पाळण्याचे काही नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच सुतक पाळत असताना आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे हे आज आपण जाणून घेऊया. व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीची नाते किती जवळचे आहे यावरून सुतक पाळले जाते.

सुतक म्हणजेच अशौच, मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ. सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते. व्यक्तीच्या निधनानंतर 1 ते 13 दिवस अशौच पाळण्याची प्राचीन प्रथा आहे. तर एखाद्या व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्या क्षणापासून सुतक हे आपल्याला चालू होते. सुतकांमध्ये आपल्याला अनेक नियमांचे पालन करणे देखील गरजेचे असते.

तर सुतकांमध्ये घरातील देवपूजा तसेच कोणतेही मंगल कार्य म्हणजे शुभ कार्य करणे अशुभ मानले गेलेले आहे. म्हणजेच कोणतेही मंगल कार्य किंवा शुभकार्य या सुतकाच्या दिवसांमध्ये अजिबात करायचे नाही. तसेच कोणत्याही मंदिरामध्ये देखील आपण देवी देवतांचे दर्शन घ्यायला जायचे नाही. तुम्ही बाहेरून दर्शन घेतले तरीही चालते.

परंतु मंदिरात जाऊन देवी देवतांचे दर्शन अजिबात घ्यायचे नाही. तुम्ही एखादा मंत्र किंवा कीर्तन, प्रवचन करू शकता किंवा हरिपाठ वाचन देखील करू शकता. तसेच तुमची जी काही नोकरी असेल, धंदा असेल त्यांनी आपल्या नोकरीवर जाण्यास परवानगी आहे.

परंतु ज्या व्यक्तीने अग्नी दिला आहे या व्यक्तीला मात्र दहा दिवस घराबाहेर जायचे नसते. सुतकामध्ये तुम्ही पलंग गादीवर देखील झोपायचे नाही. तसेच तुम्ही दररोज अंघोळ करायची आहे. मात्र आंघोळ करून झाल्यानंतर कपाळाला तिलक तसेच अत्तर किंवा सेंट देखील तुम्ही वापरायचा नाही. या काळात नवीन वस्त्र देखील परिधान करायचे नाही. जे तुमचे नित्याचे कपडे असतील तेच फक्त घालायचे आहे. नवीन वस्त्र अजिबात परिधान करायचे नाही.

तसेच ज्या दिवशी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्या दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्व लोकांनी डोक्यावरून अंघोळ करायची आहे. तसेच सुतकांतील सर्व कपडे धुवायचे आहेत आणि घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे. मग अकराव्या दिवशी घरातील स्त्रियांनी कुंकू, टिकली तसेच गंध देखील वापरण्यास परवानगी असते. तसेच आत्म्याला पुढील त्याच्या गतीकरता अकरावा बारा दिवशीचे विधी करणे गरजेचे आहे.

तसेच चौदाव्या दिवशी घरामध्ये उदक शांती तसेच निधन शांत करावी आणि मगच आपल्या घरातील देवपूजा करायचे आहे. तसेच त्या दिवशी ज्यांनी खांदे दिले आहेत त्या खांदेकऱ्यांना नातेवाईकांना गोडाचे भोजन देखील करायचे असते. तसेच संध्याकाळी अग्नी देणाऱ्यांनी डोक्यावर नवीन टोपी घालावी. तसेच खांद्यावरती टॉवेल घेऊन शंकराच्या मंदिरात जाऊन तुपाचे निरंजन अवश्य लावून ठेवायचे आहे.

म्हणजेच शंकर ही मृत्यूची देवता आहे. त्यामुळे आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी तसेच कुटुंबातील सर्वांचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी तेथेच काढून ठेवायचे आहे आणि लावलेले निरंजन घरी अजिबात आणायचे नाही. सुतक काळामध्ये निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्रीने अजिबात टिकली लावायची नाही.

तसेच घरामध्ये दहा दिवस काळा चहा सोडून काहीही बनवायचे नसते. सुतकामध्ये केस व दाढी देखील कापणे अनिवार्य आहे. त्या व्यक्तीच्या कुटुंबाबरोबरच भावकी तसेच आडनाव बंधूनाही असते. दहाव्या दिवशी दशक्रिया विधी केला जातो. ज्यामध्ये पिंडाला कावळा शिवला तर निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली आहे असे मानले जाते.

आणि दहावा दिवस झाल्यानंतर सुतक फिटले जाते. निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील सर्व पुरुषांनी टक्कल करायचे असते. तेरावा विधी देखील तेराव्या दिवशी केला जातो. त्या विधीला नातेवाईकांना बोलवतात आणि गोडधोड खायला देखील केले जाते. दहाव्या किंवा तेराव्यानंतरच स्त्रियांनी टिकली किंवा गंध लावायला सुरुवात करायची असते.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुतक काळ हा असतो आणि वरील सांगितलेले हे नियम तुम्ही सुतकाच्या दिवसांमध्ये पालन करायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *