डोळ्यात अश्रू उभे करणारा स्वामी भक्तीचा चित्तथरारक अनुभव..

अध्यात्मिक

मी आज नेहमीप्रमाणे स्वामींच्या केंद्रात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून निघणार तितक्या वेळात मला फोन आला की तुमचा मुलगा रिक्षा मधून खाली पडला आहे आणि त्याला शुद्ध नाहीये. फोन करणाऱ्यांनी मला ती जागा सांगितली कुठे झाले आहे तिकडे यायला. मी मागे वळले आणि स्वामी महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि त्यांना साकडे घातले की माझ्या मुलाला काही होऊ देऊ नका.

मी स्वामींच्या केंद्रा मधली विभूती देखील घेतली आणि जवळपास धावतच त्या ठिकाणी गेले होते. बरेच लोक गर्दी करून उभे होते पण कोणीही मदतीला पुढे येत नव्हते. त्यातील एका जणाने 108 ला म्हणजेच ॲम्बुलन्सला फोन लावून गाडी बोलावून घेतले होते. माझा मुलगा तिथे अगदी निपचित पडला होता. त्याच्या पायाला मार लागलेला होता.

त्याच्या तोंडावर पाणी टाकले तशी थोडी शुद्ध आली आणि मग आलेल्या ॲम्बुलन्समध्ये त्याला घेऊन दवाखान्यामध्ये नेले. माझा स्वामी समर्थ महाराजांचा जप निरंतर चालूच होता. दवाखान्यामध्ये त्याला ऍडमिट केले गेले. पायाला प्राथमिक उपचार झाले. पण जेव्हा त्याचे एक्स-रे काढायला गेलो तर तो काही व्यवस्थित येतच नव्हता. खूप लागल्यामुळे त्याचे ऑपरेशन देखील करायला लागणार होते.

मुलाचा रक्तगट देखील मिळायला थोडासा अवघड होता. पण स्वामींचे नाव घेतले आणि तीपण सोय झाली. ऑपरेशन करावे लागणार होते. मी विनवणी करत होते की महाराज यातून काही तरी मार्ग काढा. दुसऱ्या दिवशी विशेष गोष्ट घडली. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास एक कुत्रा दवाखान्यांमध्ये घुसला आणि माझ्या मुलाच्या बेडच्या खाली येऊन बसला. मला कुत्र्याच्या चेहर्‍यावर एक वेगळेच तेज दिसत होते.

पहिल्या मजल्यावर तो कुत्रा कसा आला. खाली पहारेकरी असताना त्याने वर येणे आणि माझ्या सोनुल्याचा जवळ असणे हा काही योगायोग नव्हता. मी मनात म्हणाले हेच स्वामींचे नियोजन आहे. मी माझ्या जवळची पोळी त्याला खायला दिली. थोड्यावेळाने परत एकवेळ एक्सरे काढायला निघाले यावेळी पण स्पष्ट झाले नाही. तेव्हा डॉक्टर म्हणाले उद्या सकाळी पायाचे ऑपरेशन करू कारण जास्त वेळ थांबू शकत नाही.

एक जोखीम आहे. तुम्ही फॉर्म भरून सही करा. ऑपरेशन यशस्वी होईल किंवा नाही ही आमची जबाबदारी नाही. महाराजांचे नाव घेऊन सही केली.तिसऱ्या दिवशी सकाळी इथेच बाहेर उभे राहून जप करत होते. ऑपरेशन सुरू केला जवळपास दोन तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले हे थोडं वेगळंच झालं वाटत होतं तितकं सोपं नव्हतं.

पण आता एकदम व्यवस्थित आहे. वाटले होते त्यापेक्षा गोष्ट खूप चांगली आहे आणि हाडाची फक्त जागा सरकली आहे. आम्ही भूल देऊन सरळ करून घेतले आहे. महिनाभरा मध्ये पेशंट परत चालायला लागेल. कशाची म्हणजे कशाचीच गरज पडली नव्हती. पायात रॉड नव्हते. माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या. माझ्या मुलाला स्वामींनी आशीर्वाद दिला होता आणि म्हणूनच तो कुत्रा काल आला होता.

स्वामींचा दूत बनून तो आला होता. महाराज त्यांच्या भक्ताच्या मागे नेहमीच कुठे ना कुठे कसेही उभे राहतात आणि त्यांना वाऱ्यावर सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ.आपली श्रद्धा असली की, महाराज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला मदत हे नक्की करत असतात तुम्हाला अनुभव कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *