स्वामींचा फोटो कोणत्या दिशेला लावावा? कसा ठेवावा?

अध्यात्म माहिती

स्वामींचे सेवेकरी असू द्या किंवा आता झालेले जे नवीन सेवेकरी आहेत ते असू द्या, त्यांना नेहमी एक प्रश्न मनात येतो की, आमच्या घरात स्वामींचा फोटो आहे तर आम्ही तो कोणत्या दिशेला लावावा? कोणत्या रूम मध्ये लावावा? नवीन सेवेकरांनाही प्रश्न पडतो की आम्ही फोटो आणलाय पण तो कुठे ठेवू? आम्हाला फोटो घ्यायचा आहे पण तो आम्ही कोणत्या दिशेला लावू?

याबद्दल आपण माहिती पाहू आणि फोटो लावण्याचे काही छोटे छोटे सोपे नियम पाहू

स्वामींच्या फोटो हा नेहमी आपण आपल्या हॉलमध्ये किंवा देवघरात लावावा. काही लोक हॉलमध्ये सुद्धा फोटो लावतात जेणेकरून आपण आपला संपूर्ण दिवस आपल्या हॉलमध्ये घालवत असतो म्हणून फोटो आपण हॉलमध्ये सुद्धा लावू शकतो किंवा देवघरात सुद्धा लावू शकतो. फोटो लावण्याची दिशा ही फक्त पूर्व दिशा किंवा पश्चिम दिशा असायला हवी.

एक महत्त्वाचा नियम तो म्हणजे स्वामींचा फोटो असू द्या किंवा अन्य कोणत्या गुरूंचा किंवा देवांचा फोटो असू द्या तो फोटो कधी भिंतीवर टांगू नये. आपली सवय असते आपण एखादा खिळा भिंतीवर ठोकतो आणि त्याला फोटो टांगून ठेवतो. पण भिंतीवर फोटो कधीच टांगून ठेवू नये.

जर तुम्हाला भिंतीवर फोटो लावायचा असेल तर एखादी पाटी किंवा काचेची किंवा लाकडाची एखादी फळी काहीतरी असे भिंतीवर थोकावे आणि त्यावर स्वामींच्या फोटो उभा करावा. म्हणजे फोटो भिंतीवरच राहील पण तो टांगलेला राहणार नाही. रोज स्वामींच्या फोटोला धूप किंवा अगरबत्ती ओवाळावी आणि शक्य असेल तर अगरबत्ती लावावी.

दर गुरुवारी तुम्हाला जमल्यास तुम्ही स्वामींना फुलांचा हार लावावा.घरात हॉलमध्ये किंवा देवघरात स्वामींच्या फोटो तुम्ही लावला असेल तरीही तुमच्या देवघरांमध्ये स्वामींची एक छोटीशी मूर्ती असायला हवी. जेणेकरून आपल्याला रोज स्वामींची पूजा करता येईल.तर तुम्ही फोटो या नियमानुसार आपल्या घरात लावून घ्यावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *