स्वयंपाक घरामध्ये या गोष्टी एकत्र ठेवू नका

माहिती वास्तुशास्त्र

मित्रांनो, आपल्या स्वयंपाक घर सगळ्यांपेक्षा सुंदर असावं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या स्वयंपाक घरात विविध प्रकारच्या वस्तू असाव्यात असे आपल्याला वाटत असते. आपल्या किचनमध्ये म्हणजेच की स्वयंपाक घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आपण करत असतो.

स्वयंपाक घर उठावदार दिसण्यासाठी आपण आजकाल फॅशनच्या फरशा देखील लावत आसतो. आपल्या घरामध्ये चांगले उठावदार देण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे भांडे देखील वापरत असतो. स्वयंपाक घरामध्ये आपल्याला दररोज लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये पाहिजे.त्यासाठी आपण त्या सर्व वस्तू एकत्र करून ठेवत असतो.

तर मित्रांनो आपल्याला माहीत नसते की कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला त्याचा त्रास होणार आहे.त्याच्यामुळे आपण सर्व वस्तू स्वयंपाक घरात ठेवत असतो. अशा कोणत्यातरी वस्तु असतात त्याच्यामुळे आपल्याला वाईट परिणाम भोगायला लागत आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया स्वयंपाक घरामध्ये कोणत्या दोन गोष्टी ठेवल्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे व अनेक अडचणींना सामोरे जावेच लागणार आहे.

तर मित्रांनो आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक घरामध्ये अग्नी आणि पाणी एकत्र ठेवू नये. म्हणजेच पाण्याची भांडी एकत्र ठेवायची नाहीत. आपल्या गॅसच्या बरोबर एकत्र रेषेमध्ये वॉश बेसिन आपण करत असतो. तर ते वॉश बेसन शास्त्रानुसार अशुभ आहे असे सांगितले गेलेले आहे. व तसे केल्यास आपल्याला अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. असे देखील सांगितले आहे.

त्याचबरोबर आपण वॉश बेसिन सुद्धा तिथेच करत असतो.आपण किचन वरच पाण्याची भांडी देखील ठेवत असतो .व ते गॅस ला लागून आपण ठेवत असतो. तर मित्रांनो आपण आपल्या किचन मध्ये म्हणजेच स्वयंपाक घरामध्ये गॅस व पाणी एकत्र ठेवायचं नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. घरामध्ये रोज वारंवार भांडण तंटे व घरामध्ये मतभेद हे गॅस आणि पाणी एकत्र ठेवल्यामुळे देखील होऊ शकतात.

आपल्या स्वयंपाक घरामध्ये कायम मीठ पीठ तांदूळ चटणी हळद हे संपण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये भरून ठेवायचे आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हळद व मीठ एकत्र ठेवायचे नाहीत. आपण मसाल्याच्या डब्यामध्ये हळद ठेवायची आहे .व मिठाला आपण वेगळा डबा करायचे आहे. औषध म्हणजेच मेडिसिन स्वयंपाक घरात ठेवतात तर ते स्वयंपाक घरात ठेवू नका.

स्वयंपाक घर हे आपल्या आरोग्याशी संबंधित असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे मेडिसिन किंवा औषध आपल्याला किचनमध्ये ठेवायचे नाही आहेत. तर शास्त्रानुसार असं सांगण्यात आले की तुम्ही जर असे करत असाल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वाढ होत राहतो.

घरामधील एखादी व्यक्ती सतत आजारी देखील पडू शकते. आजारी पडलेल्या व्यक्तीला हे आपल्याला दवाखान्यामध्ये दाखवायलाच लागते.याच्यामुळे तुमचा पैसा देखील नाहक खर्च होऊन जातो.तर पैसा खर्च होऊ नये म्हणून तुम्ही या गोष्टी करणे टाळायचे आहेत. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरामध्ये आरसा देखील ठेवू नये.

स्वयंपाक घरामध्ये गॅस असतो तो आगीचा मुख्य केंद्र मानला जातो. आगिच चित्र आरशामध्ये दिसल्यावर आपल्याला व आपल्या घरामध्ये ते शुभ नसते. ज्या गोष्टी आपण वापरत नाही त्या गोष्टी आपण स्वयंपाक घरामध्ये ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. त्याच्यामुळे आई अन्नपूर्णेला राग देखील येऊ शकतो.

आपल्याला आपल्या फ्रीजमध्ये जास्त दिवसाचे शिळे अन्न ठेवायचे नाही आहेत. तुम्हाला शनि राहू दोष प्राप्त होऊ शकतो. आपल्या किचन मध्ये मीठ संपण्या अगोदर आणून ठेवायचे आहे.कारण मिठामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असते. असे सांगितले गेले आहे की, किचनमध्ये एक मिठाचा डबा ठेवा व त्यातले मीठ वारंवार बदलायचे आहे.

ते मीठ कुठेही न टाकता आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचे आहे. असे सांगितले गेलेले आहे. स्वयंपाक घराच्या बाजूला बाथरूम असू नये कारण ते अशुभ मानले गेलेला आहे. वास्तुशास्त्रानुसार असे देखील सांगितले गेले आहे की, आपले स्वयंपाक घर आपल्या मुख्य दरवाजाच्या बरोबर समोर कधीही करायचे नाही.

मित्रांनो मी जे तुम्हाला आता वरती सांगितलेला आहे.त्याचा तुम्हाला व्यवस्थित रित्या व काटेकोरपणे पालन करायचे आहे. असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा होणार नाही व घरामध्ये वारंवार भांडणे होणार नाही. पैसे विनाकारण खर्च देखील होणार नाहीत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *