का ताटात तीन भाकरी वाढणे का अशुभ मानले जाते..? हे आहे त्याचे खरं कारण..!

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये जेवणासंबंधीचे अनेक नियम आपणाला सांगितलेले आहेत. म्हणजेच या दिशेला जेवण केल्याने आपणाला फायदा होतो असे बरेचसे नियम आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत. आपल्याला आपल्या उत्तम आरोग्यासाठी जेवण खूपच महत्त्वाचे आहे. आपला आहार योग्य त्या पद्धतीने जर आपण घेतला तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या रोगांचा सामना देखील करावा लागत नाही.

तसेच मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले गेलेले आहे की एका ताटामध्ये तीन भाकरी कधीही वाढू नये. परंतु या मागचे कारण बऱ्याच जणांना माहिती नाही. तर मित्रांनो एका ताटामध्ये तीन भाकरी का वाढू नये यामागचे नेमके कारण कोणते आहे हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे.

म्हणजेच आपण ताटामध्ये वाढताना दोन किंवा चार भाकरी वाढत असतो. परंतु कधीही तीन भाकरी अजिबात ताटात वाढल्या जात नाहीत. एका ताटामध्ये तीन भाकरी वाढणे हे अशुभ मानले गेलेले आहे.

म्हणूनच जर एखाद्याला आवश्यक असल्यास तीन भाकरी द्याव्या लागल्या तर एक भाकरी दोन भागांत अर्धी-अर्धी करून दिली जाते. म्हणजेच त्या चार मानल्या जातात. ज्योतिषी म्हणतात की हिंदू मान्यतेनुसार तीन संख्या अशुभ मानली गेलेली आहे. म्हणून कोणत्याही शुभ कार्यात तीन क्रमांकाकडे विशेष लक्ष दिले जाते.

मित्रांनो तुम्ही तर पाहिले असेलच की, एखाद्या धार्मिक कामात किंवा शुभकार्यांमध्ये तीन गोष्टींचा कधीच समावेश केला जात नाही. त्यामुळे अन्न देण्यापूर्वीही त्याच नियमांचे पालन केले जाते. असे मानले जाते की त्रयोदशी समारंभापूर्वी एखाद्या व्यक्तीच्या जेवणात मरणानंतर तीन भाकरी खाल्या जातात.

जे अन्न काढून टाकणाऱ्याशिवाय इतर कोणालाही दिसत नाही. म्हणून तीन भाकरी खाणे म्हणजे मृत व्यक्तीचे अन्न समजले जाते. तीन भाकरी खाल्ल्याने तुमच्या मनात वैरभाव निर्माण होतो. प्राचीन काळापासून येथे ज्या काही श्रद्धा येत आहेत त्यामागे वैज्ञानिक तथ्य देखील नक्कीच लपलेले आहे.

ऊर्जा तज्ञांच्या मते, दोन चपाती, एक वाटी डाळ, 50 किंवा 100 ग्रॅम तांदूळ आणि एक वाटी भाजीपाला सामान्य व्यक्तीसाठी एक वेळच्या जेवणासाठी संतुलित मानला जातो.
तसेच मित्रांनो आपण सर्वजण आता जेवणानंतर इतर काही पदार्थ देखील खात असतो.

त्या पदार्थांपासून देखील आपणाला अनेक पोषक तत्व देखील मिळतात. म्हणजेच जर आपण यापेक्षा जास्त खाल्ले तर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

आरोग्य तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की पाचन प्रणाली ठीक ठेवण्यासाठी अन्न थोडेसे खावे आणि एकत्र जास्त खाऊ नये. म्हणूनच संतुलित आहार ठेवण्यासाठी तीन भाकरी एकत्र वाढणे अशुभ मानले जाते. एका वेळी जास्त प्रमाणात खाणे टाळा. शक्य असल्यास थोड्या थोड्या वेळाने खा.

तर मित्रांनो यामुळेच एका ताटामध्ये आपण तीन भाकरी कधीही वाढत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आपल्या धर्मशास्त्रानुसार देखील हे खूपच अशुभ आहे आणि ते आपल्यासाठी खूप परिणामकारक देखील असू शकते. त्यामुळे मित्रांनो एका ताटामध्ये तीन भाकरी कधीही वाढल्या जात नाहित.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *