तुळशीची माळ धारण करण्याचे नियम?

अध्यात्म माहिती

तुळशीची माळ गळ्यात घालतय? तुळशीमाळ घालण्यापूर्वी त्याचे नियम आणि महत्त्व किंवा फायदा तुम्हाला माहिती आहे का? हिंदू धर्मात तुळस ही वनस्पती फार महत्त्वाची आहे. शास्त्रमध्ये तुळशी सर्वात शुद्ध जाते, म्हणूनच ती शिळी झाल्यावर ही पूजेमध्ये वापरली जाते. कारण भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे.

त्यांच्या पूजेचा प्रसादामध्ये अर्पण करणं बंधनकारक त्याशिवाय पूजा करणं अपूर्ण मानलं जातं. बहुतेक घरात तुळशीचे रोप लावले जातात. कारण तुळशीची लागवड केल्यास घरात आनंद आणि समृद्धी येते. या तुळशीपासून तयार केलेल्या माळेचे देखील तितकंच महत्व सांगण्यात येतं. मात्र बरेच जण तुळशीची माळ घालतात? परंतु ती का घालावी?

आणि हि माळ घालण्याचे नियम त्यांना माहिती नसतात? चला तर मग तुळशीची माळ का घालतात किंवा तुळशीमाळ महत्वाची का आहे किंवा तुळशीची माळ खरी कशी ओळखावी? तुळशी माळ घालण्याचे नियम काय? तुळशीची माळ जपताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया..

तुळशीचे अनेक भाग हिंदू धर्मातील आणि देवतांचे आणि पवित्र ग्रंथ यांचे निवासस्थान असल्याचे मानले जातात. शिवाय तिला देवी लक्ष्मीच भौतिक स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. तसेच भगवान श्रीहरी विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त तुळशीची माळ घालतात. असं म्हणतात की, ही माळ परिधान केल्याने आपलं मन आणि आत्मा शांत राहतं.

तसेच ही तुळशीची माळ परिधान केल्याने रोगापासून मुक्तता मिळते. शास्त्र व्यतिरिक्त ज्योतिष यांतही तुळशीमाळ महत्त्वाची मानली जाते. ही माळ घालून बुध आणि गुरु ग्रह मजबूत होतात. तुळशी माळ घातल्यास कोणत्याही वास्तूतील दोष दूर होतात. कारण पौराणिक कथेनुसार तुळशीला वरदान मिळाले आहे

कि, भगवान श्रीहरी विष्णू केवळ तुळशीची पाने अर्पण केलेले नैवद्य स्वीकार करतात. तसेच जी व्यक्ती तुळशीची माळ परिधान करते तिला वैकुंठाची प्राप्ती होते, असे म्हटले जात. मात्र ही तुळशीमाळ योग्य कशी ओळखावी? तर तुळशीची योग्य माळ ओळखण्यासाठी ती अर्धा तास पाण्यात ठेवावी.

जर त्याने त्याचा रंग सोडला तर हे एक बनावट माळ आहे, असं समजावं. तुळशीच्या माळा दोन प्रकारचे असतात श्यामा तुळशी आणि रामा तुळशी. मान्यतेनुसार श्यामा तुळशीची माळ धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती मिळते. यासोबतच आर्थिक लाभ होतो असे म्हणतात. तर दुसरीकडे रामा तुळशीची माळ घातल्याने आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते.

ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील वातावरणही चांगलं राहतं. तुळशीमाळ जपणं आणि घालणं अत्यंत महत्त्वाचा मानला तरी तुळशी माळ घालण किंवा जपणं त्याचेही काही नियम सांगितले जातात. त्यामुळे नियमांचं पालन करूनच तुळशीची माळ धारण करून जप केल्यास सुख-समृद्धी वाढते, याचबरोबर धनप्राप्ती होते.

ज्योतिषशास्त्रात त्याचे नियम आहेत. यामध्ये तुळशी माळ धारण करणे आधी स्नान करावं. मात्र यासाठी त्या व्यक्तीने तुळशीची माळ घालताना की जपताना या गोष्टींची काळजी घ्यावी. परिधान केलेल्या व्यक्तींना दररोज जप करावा लागतो, त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूची कृपा कायम त्यांच्यावर राहते.

तुळशीची माळ घातलेली व्यक्तीने सात्विक अन्न खावं त्याचा अर्थ असा की अन्नात लसूण, कांदा, मांस आणि मासे इत्यादींत सेवन करू नये. कोणत्याही परिस्थितीत तुळशीची माळ शरीरापासून दूर होऊ देऊ नये. याबरोबरच तुळशीमाळ जपण्याचे नियम आहेत. तुळशीची जप करण्याची माळ वेगळी आणि परिधान करण्याची वेगळी असे दोन्ही वेगवेगळ्या असतात.

तुम्ही जे तुळशीची माळ जपत असाल ती परिधान करू नये. जपमाळ जप केल्यानंतर स्वच्छ कपड्याने झाकून ठेवावी आणि या तुळशीच्या माळेचे 108 मनी असावेत असं सांगितलं जातं. तर अशाप्रकारे श्रीहरी विष्णूचा भक्तांसाठी तुळशीमाळ महत्त्वाची का आहे.

किंवा तुळशीची माळ तरी कशी ओळखावी, तुळशीमाळ काय नियम आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे. अशाच प्रकारे तुळशीच्या माळी बद्दल आणखी एक प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *