तुळशीमाळ घालताना ‘या’ चुका अजिबात करू नका नाहीतर……

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त असतातच.हिंदू धर्मात तुळशीमाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरेचजण पंढरपूर येथे जाऊन तुळशीची माळ घालतात. असं म्हणतात की तुळशीचं रोपटं ज्या घरी असतं तिथे माता लक्ष्मी वास करते. तुळशीमाळेसोबत जर भगवान विष्णुच्या मंत्राचा जाप केल्यास पुण्य मिळतं.

कोणत्याही मंत्राचा जप जर तुळशीमाळेने केल्यास भगवान श्री हरि लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. देशात नावलौकीक असणाऱ्या आणि महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या वारकरी संप्रदायात तुळशीमाळेला मानाचं स्थान आहे. या माळेला गळ्यात घातल्यानंतर मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतं. सोबत सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

पण तुळशीमाळेला घालताना काही चुका कधीही करू नये. तर या चुका नेमक्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात.
ज्योतिषशास्त्रानुसार जाप करणारी माळ आणि गळ्यात घालणारी माळ एक नसते. या दोन्ही वेगवेगळ्या असतात. सोबतच जे लोक गळ्यात तुळशीची माळ घालतात त्यांना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

जर या गोष्टीची काळजी घेतली तर माता लक्ष्मी आणि श्री हरि नाराज होत नाही. चला तर जाणून घेऊया तुळशी माळ धारण करताना कोणते नियम पाळावे? ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी दोन प्रकारच्या असतात. एक रामा तुळशी आणि दुसरी श्यामा तुळशी. या दोन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या तुळशी असतात. तुळशीमाळेला धारण केल्यानंतर कडक नियमाचं पालन करावे.

त्या व्यक्तीने सात्विक जेवण करावे. मास-मदिरापासून दूर रहावे. सोबतच लसून कांदा इत्यादीचं सेवन करू नये.तसेच एकदा तुम्ही तुळशीमाळ घातली तर पुन्हा कधीच काढू नये. तुळशीमाळेला घालताना चांगल्या गंगाजलने धुवावे. त्यानंतर माळ सुखल्यावर ही माळ घालावी. तुळशीमाळेला धारण करताना चुकूनही रुद्राक्ष धारण करू नये. यामुळे अशुभ फलप्राप्ती होते.

जर तुम्ही तुळशीची माळ गळ्यात धारण केली नाही तर उजव्या हातात घालू शकता. मात्र नित्य क्रिया आधी ही माळ काढून ठेवावी. त्यानंतर अंघोळीनंतर तुम्ही ही माळ गंगाजलनी धुवून पुन्हा धारण करावी.तर मित्रांनो तुम्ही देखील जर तुळशीची माळ गळ्यात घालणार असाल किंवा घातली असेल तर वरील नियमांचे पालन अवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *