तुमच्या घरात झाडू जर अशा चुकीच्या पद्धतीने ठेवला असेल तर लगेच हे जाणून घ्या

अध्यात्मिक

मित्रांनो तुमच्या घरात झाडू या ठिकाणी ठेवलेला असतो का? जर या ठिकाणी तुमच्या घरात झाडू ठेवलेला असेल तर हा झाडू तुमच्या घरातल्या तुमच्या अडचणी वाढवू शकतो. घरात बरकत, सुख समृद्धी, दूरची गोष्ट पण घरात गरीबी येऊ शकते, अडचणी वाढू शकतात, सुख-समृद्धी नाहीशी होऊ शकते.

कारण असा झाडू आणि या ठिकाणी झाडू ठेवल्याने अलक्ष्मी घरात येते. लक्ष्मी कधीच त्या घरात येत नाही. म्हणून झाडू संबंधित या गोष्टी तुम्ही नीट समजून घेतल्या पाहिजे आणि तो व्यवस्थित ठेवला गेला पाहिजे. कारण आपल्या घरात झाडू हे एक लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं.

कारण झाडू कचरा घाण बाहेर काढतो आणि घाण आणि कचरा बाहेर गेल्याने अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाते. म्हणून त्याला एक उच्च दर्जा मिळालेला असतो. म्हणून आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा झाडूचे पूजन करत असतो. तर आपण जाणून घेऊया की कोणत्या ठिकाणी झाडू अजिबातच ठेवला नाही पाहिजे.

आणि जर तुम्ही ठेवला असेल तर आत्ताच लगेच तिथून उचलून योग्य ठिकाणी ठेवा.आता झाडू कोणत्या ठिकाणी नाही ठेवायला पाहिजे? तर झाडू पलंगाखाली, बेड खाली अजिबात ठेवायचा नाही. कारण आपण पलंगावर बेडवर झोपतो त्याच्या खालीच आपण झाडू अजिबात ठेवायचा नाही. त्यानंतर आपल्या घरात कपाट असेल तर त्या कपाटाचा खाली सुद्धा झाडून ठेवायचा नाही.

आणि कपाटाच्या साईडला आजूबाजूला उभा करून किंवा कोपऱ्यात सुद्धा ठेवायचा नाही. कधी कधी आपण एका कोपऱ्यामध्ये झाडू उभा करून ठेवून देतो कोणाला दिसणार नाही असा पण झाडू असा उभा करून ठेवायचाच नाही मग तो कपाटाचा आजूबाजूला असो किंवा भिंतीला टेकून असो. झाडू उभा मुळीच करायचा नसतो. तो खाली झोपून ठेवायचा असतो.

आता झाडू नेमका कुठे ठेवायचा? तर झाडू अशा ठिकाणी ठेवायचा की तो कोणाला दिसला नाही पाहिजे. पलंगाखाली, बेड खाली, कापटा खाली ठेवायचा नाही, झाडू उभा करून ठेवायचा नाही या गोष्टी सोडल्या तर बाकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही झाडू ठेवू शकता. सोफ्या खाली आडवा झाडू ठेवू शकता, टेबलच्या खाली आडवा टाकून ठेवू शकता, कोणती रूम असेल तर रूम मध्ये, बाल्कनी मध्ये आडवा ठेवू शकता.तर चुकीच्या रीतीने जर तुम्ही झाडू ठेवलेला असेल तर तो आजच आत्ताच दूर करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *