तुमच्या घरात श्री यंत्र असेल तर त्यामागचे फायदे नक्की जाणून घ्या

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघर हे असतेच. देवघरांमध्ये अनेक विविध प्रकारच्या मुर्त्या आपणास पहावयास मिळतात. परंतु आपल्या देवघरांमध्ये मुर्त्याची संख्या देखील जास्त असणे अशुभ मानले गेलेले आहे. म्हणजेच मूर्तींची संख्या देखील थोडी फारच असावी. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी तसेच कोणत्याही प्रकारचे वादविवाद होऊ नये यासाठी मग आपण अनेक पूजा अर्चना उपवास करीत असतो.

मित्रांनो अनेकांच्या घरांमध्ये श्रीयंत्र आपल्याला पाहायला मिळते. आपण त्या श्रीयंत्राची पूजा देखील दररोज करीत असतो. हे श्रीयंत्र आपल्या घरात असल्याने आपल्याला नेमके कोणते फायदे होतात याची माहिती आपल्यापैकी बऱ्याच जणांना नसते. तर श्री यंत्राचे नेमके आपणाला फायदे कोणते होतात याविषयीची सविस्तर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे.

श्री विद्या ही आपल्याला मिळालेली एक महान देणगी आहे त्यामध्ये श्रीयंत्र वापरले जाणारे एक साधन आहे. त्याचे महत्त्व खूप आहे. सर्व यंत्रांमध्ये श्रीयंत्र हे शिरोमणी आहे ज्या ठिकाणी श्रीयंत्र स्थापन केले जाते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. लक्ष्मीची कृपादृष्टी कायम त्या घरावर राहते असे सांगितलेले आहे.

श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये शुभलक्ष्मीचा वास कायम राहतो. यासाठी मग आपण श्रीयंत्राची नित्यनेमाने दररोज पूजा करणे गरजेचे आहे. तसेच अनेकांच्या घरांमध्ये खूपच ताण तणाव, भांडण तंटे, वादविवाद हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून होत राहतात. जर तुम्हाला ताणतणावापासून मुक्ती हवी असेल तसेच घरातील एकमेकांचे विचार जुळावेत तसेच कोणत्याही प्रकारची भांडणे होऊ नयेत असे जर वाटत असेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तरी या सर्व अडचणी दूर होतात.

श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरात नेहमी शांतता राहते. तसेच जर घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तो देखील नाहीसा होतो. वास्तुदोषामुळे अनेक प्रकारची संकटे कुटुंबावर कायम येत राहतात. तर श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे वास्तुदोष दूर होऊन आपले घर कायमच सुखा समाधानाने नांदेल.

श्री यंत्राची स्थापना केल्यामुळे घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या मनाला मनशांती लाभते. तसेच जर तुम्ही घरामध्ये श्री यंत्र ठेवले तर यामुळे आपल्या घरातील सदस्यांना आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. त्यांचे आरोग्य नेहमी चांगले राहते. आपल्या जीवनावर कळत नकळत ग्रहांचा प्रभाव पडत असतो आणि त्यामुळेच काही ग्रहांचे ग्रहदोष सुद्धा लागतात.

ते सुद्धा निघून जाण्यासाठी श्री यंत्रामुळे मदत होते. यासाठी श्रीयंत्र घरामध्ये स्थापन केले जाते. आपल्यापैकी बरेच जण हे खूपच कष्ट घेत राहतात. परंतु हवे तेवढे यश हवे तेवढा पैसा त्यांना मिळत नाही.  म्हणजेच कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. अशा वेळेस तुम्ही जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर यामुळे पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग आपणाला सापडतात.

आपल्या घरामध्ये कधीच पैशाची चणचण भासत नाही. आपल्या व्यवसायात भरभराट होते. अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे होत असतात. आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव निवास करते. घरात सुख-समृद्धी शांतता राहते. घरात आर्थिक अडचणी निर्माण होत नाहीत आणि धनधान्याची बरकत होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *