तुमच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे? घाबरू नका, ‘हे’ बिनखर्चिक उपाय करा !

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये अनेक बऱ्याच प्रकारच्या अडीअडचणींचा सामना करावा लागतो. कितीही प्रयत्न, मेहनत केले तरीदेखील या अडचणी दूर होत नाहीत. कोणती ना कोणती अडचण आपल्यापुढे येतच राहते. तर त्यावेळेस आपण नशिबाला दोष देत बसतो.

तर मित्रांनो काही वेळेस आपल्या कुंडली मधील असलेल्या दोषामुळे देखील आपणाला आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मित्रांनो अनेकांच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग असतो. या कालसर्प दोषामुळे अनेक विपरीत घटना आपल्या जीवनामध्ये होत असतात.

तर मित्रांनो तुमच्याही कुंडलीमध्ये जर कालसर्पयोग असेल तर यावर नेमके कोणते उपाय केल्यानंतर हा दोष निघून जाईल याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

मित्रांनो, जेव्हां कुंडलीत राहू आणि केतू या ग्रहांच्या एकाच बाजूस सर्व ग्रह येतात त्याला कालसर्प योग झाला असे म्हणतात . तर कधी कधी एखादाच ग्रह या राहू आणि केतूच्या मधे असतो . बाकी सर्व दुसऱ्या बाजूस असतात. याला अर्ध काल सर्प योग म्हणतात. या दोन्हीलाही काहीसे दोष कारक म्हणतात. यामुळे मुलांना फार मोठ्या संकटातून जावे लागते असे काही नाही. मग हा दोषकारक आहे हे कसे ओळखावे ?

तर मित्रांनो घरामध्ये सतत भांडणे होणे, सतत भीती वाटणे, घरात अपंग अथवा व्यंगात्मक मूल जन्मास येणे, कर्ज , सतत पैसा खर्च होणे, आत्महत्येचे विचार सतत मनात येणे, करणी ,बाधा , भूत पिशाच या प्रकारचे त्रास होणे, देवाधर्माच्या कार्यात रस न वाटणे असे जर त्रास होत असतील तर काल सर्प दोष आहे हे जाणावे.

यापैकी काही लक्षणे आपल्या स्वतःला आढळत असतील तर आपली पत्रिका तज्ञ ज्योतिषास दाखवावी. केवळ पूजा विधी करणारे किंवा साधे गुरुजी इत्यादी लोकांना दाखवू नये. जाणकारच हवा आणि त्यामध्ये जर आपली पत्रिका पूर्णपणे दोषकारक असेल तरच नारायण नागबली ,त्रिपिंडी श्राद्ध आणि कालसर्प शांती यापैकी एक किंवा तिन्ही उपाय तीव्रतेप्रमाणे करावेत.

मित्रांनो, जर आपल्या पत्रिकेत काल सर्प योग दिसतोय पण त्याची लक्षणे फारशी जाणवत नसतील तर मी जे उपाय सांगणार आहे ते अवश्य करावेत. तर मित्रांनो तुम्ही वडवानल स्तोत्राचे पाठ करावेत. तसेच हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र या सारख्या प्रभावी स्तोत्रांचे रोज किमान सात पाठ करायचे आहेत.

हे किमान 21 दिवस तरी करायला हवेत. सुंदरकांडचा पाठ तसेच ध्यान धारणा ,मंत्र जप चालू ठेवावे. खोटे बोलणे , मत्सर , लबाडी ,स्वार्थीपणा यापासून लांब रहावे आणि अशा वागणाऱ्या लोकांपासून देखील दूर रहावे. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर हे उपाय केल्यास तुमच्या कुंडलीतील काल सर्प दोष नक्की दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *