तुमच्या पत्रिकेत असेल कालसर्प दोष! तर महाशिवरात्रीच्या दिवशी करा हा सोपा उपाय

राशिभविष्य अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण हा खूपच आनंदाने साजरा करतात. अनेक नियम धर्म पाळून तसेच विधिवत पूजा करून प्रत्येक जण उत्सवामध्ये सणांमध्ये आपली उपस्थिती दाखवत असतात. मित्रांनो बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये अनेक प्रकारचे दोष आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे कालसर्प दोष.

हा कालसर्प दोष जर तुमच्या पत्रिकेत असेल तर तुम्ही येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी जर काही हा उपाय केलात तर यामुळे तुमचा कालसर्प जो दोष आहे हा दोष नक्कीच निघून जाईल. यावर्षी अठरा फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री उत्सव आलेला आहे.

या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहेत. अनेक भक्त या उत्साहाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. भोलेनाथांना म्हणजेच महादेव यांना देवांचा देव म्हणून ओळखले जाते.

महाशिवरात्रीला धार्मिकच नव्हे तर ज्योतिषीय महत्त्वही वाढले आहे. तर महाशिवरात्रीला कालसर्प दोष मुक्तीसाठी नेमके कोणते उपाय करायचे आहेत चला तर जाणून घेऊयात. आपल्या राशीच्या कुंडलीत राहू आणि केतू यांच्यामध्ये ग्रह आले तर या दोषाला काल सर्प दोष म्हणतात. काल सर्प दोषाचे अनेक प्रकार आहेत. ज्योतिषशास्त्रात राहुला सापाचे तोंड आणि केतूला सापाचे शेपूट मानले जाते.

केतू सातव्या भावात आणि राहू पहिल्या भावात असताना काल सर्प दोष राशीच्या विवाहावर परिणाम करतो. काल सर्प दोषामुळे वैवाहिक जीवनावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे जोडप्यांमध्ये अनेक समस्या आणि तणाव निर्माण होऊन व्यावहारिक जीवन कठीण होते.

तर तुमच्या कुंडलीतील कालसर्प दोष तुमच्या सर्व त्रासांना कारणीभूत ठरत असेल तर महाशिवरात्रीला तुम्ही भगवान शंकरांची साधी पूजा अवश्य करावी. जर एखाद्या व्यक्तीने महाशिवरात्रीला उज्जैन स्थित महाकालेश्वर किंवा नाशिक स्थित त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग किंवा प्रयागराज स्थित तक्षकेश्वर महादेव मंदिरात पूजा आणि रुद्राभिषेक केला तर त्याला जन्मकुंडलीशी संबंधित या कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.

जर तुम्हाला कालसर्प दोष टाळायचा असेल तर महाशिवरात्रीला भगवान शंकराला चांदीच्या नागांची जोडी अर्पण करावी. तसेच महाशिवरात्रीच्या दिवसापासून दिवसातून दोनदा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुम्हाला कालसर्प दोषापासून मुक्तता नक्कीच भेटेल.

तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी ‘ओम नागकुलाय विद्महे विषदन्तया धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात्’ हा जप करा.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करून रुद्र-अभिषेक करावा. कालसर्प दोष पीडित व्यक्तीने काल सर्प दोषाचे नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी नागपंचमीचे व्रत देखील करावे.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे उपाय जर महाशिवरात्रीच्या दिवशी केले तर यामुळे तुमच्या कुंडलीतील जो काही कालसर्प दोष आहे हा कालसर्प दोष नक्कीच निघून जाईल. त्याच्या प्रभावाने जो काही त्रास आपल्याला सहन करावा लागणार होता तो त्रास अजिबात होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *