तुम्हीही स्वामींचा जप करता जप माळेचे काही नियम…..

अध्यात्मिक

मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक वेगळे प्रकारचे उपाय करत असतो पूजा प्रार्थना देखील करत असतो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताही मार्ग सोडत नाही स्वामींची सेवा आपण घरामधून देखील करतो किंवा मठामध्ये देखील आपण जाऊन करत असतो स्वामींचे अनेक अध्याय आपण वाचत असतो.

स्वामी सारांमृत देखील आपण वाचत असतो तर मित्रांनो घरामध्ये एखादी व्यक्ती जरी जप करत असेल तर त्याची काही नियम देखील आहेत तर ते नियम कोणते आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो जपमाळ कधीही हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करायचे आहे जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मनी आपल्याकडे ओढायचे आहेत माळेचे मणी एकमेकांवर आपटणार नाही किंवा आदळणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे.

माळेचे मणी नेहमी गाठवलेलेच असावेत याची आपण काळजी घ्यायची आहे जप करताना मेरू मणी येतात कोणत्याही परिस्थितीत मेरूमनी ओलांडून जप करायचा नाही. चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालायचे आहेत. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्याचे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करायचा आहे.

जपमाळीने जप करताना शक्यतो गोमुखी वापरायची आहे गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यायचे आहे एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरायची आहे दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये जप झाल्यावर माळेला वंदन करायचे आहे माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबी मध्ये ठेवायचे आहे.

कुठेही अस्तवेस्त पडलेली नसायला हवी एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला कधीही देऊ नये माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन सर्वात अगोदर प्रार्थना करायची आहे जप करताना नेहमी आसनावर बसूनच करायचा आहे या सर्व नियमांमुळे केलेला जप सफल होतो असं म्हटलं जातं तर मित्रांनो साधे सोपे असे काही नियम आहेत ते तुम्ही आवश्य पाळायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *