तुरटीने समस्या लगेच दूर होतात, धनप्राप्ती होऊन सुख-समृद्दी येते

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये कोणती ना कोणती अडचणी असते तर ती पैशासंबंधीच्या असू दे किंवा आजारपण ह्या अडचणी प्रत्येकांच्या घरात निर्माण होत असतात तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करून बघत असतो तरी देखील आपल्याला त्याचा हवा तसा परिणाम बघायला मिळत नाही.

तर मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यात जसे की मीठ हळद तुरटी इत्यादी या सध्या साध्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये जीवनातील अनेक प्रकारचे वास्तुदोष आणि समस्या दूर करण्याची ताकद असते घरात वास्तुदोष असल्यास ते सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या दूर करतात.

एवढेच नव्हे तर घराच्या स्वयंपाक घरात असे अनेक वास्तू संबंधित दोष देखील दूर करण्यात मदत करत असतात. मित्रांनो आज आपण तुरटीच्या संबंधित काही वस्तू उपाय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशच बंद करू शकता आर्थिक स्थिती सुधारू शकते आरोग्य सुधारू शकते तर त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये वास्तुशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ती दूर करण्यासाठी 50 ग्रॅम तुरटीचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि घराच्या किंवा ऑफिसच्या प्रत्येक खोलीत किंवा कोपऱ्यात ठेवायचा आहे.जिथे इतर कोणालाही दिसणार नाही.

याने विविध वास्तुदोषांमुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि तुमच्या घरात सुख-शांतीसोबतच संपत्तीतही वाढ होईल.लक्षात ठेवा की तुरटीचा रंग काही दिवसांनी बदलू लागला की त्याऐवजी नवीन तुरटी ठेवायची आहे यामुळे वास्तुशी संबंधित विविध समस्या कमी होतील आणि सुख-शांतीसोबतच धन-समृद्धी वाढेल.

व्यवसायात प्रगती मंद असेल किंवा नोकरीत प्रगती होत नसेल तर लाल कपड्यात तुरटीचा तुकडा बांधून मुख्य दरवाजावर अडकवायचा आहे तुरटीच्या या उपायाने तुम्हाला खूप फायदा होईल.झोपण्यापूर्वी काळ्या कपड्यात तुरटी बांधून उशीखाली ठेवल्यास वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि अज्ञात भीतीपासून मुक्ती मिळते.

तुरटीचा उपायही आर्थिक लाभासाठी प्रभावी ठरू शकतो. यासाठी तुरटीचा वापर घराची मॉपिंग करताना करता येतो. या उपायाने घरातील सदस्यांचे आजार कमी होतील आणि त्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल.कधी-कधी अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा थोडासा तुकडा टाकून आंघोळ करावी. असे केल्याने आर्थिक प्रगतीतील अडथळे दूर होतील आणि धनही प्राप्त होईल.

याशिवाय तुरटीयुक्त पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेशी संबंधित आजारांपासून मुक्ती मिळते .ज्या लोकांवर कर्ज जास्त आहे आणि ते वेळेवर कमी करायचे आहे.त्यांनी तुरटीमध्ये सिंदूर टाकून त्यावर सुपारी गुंडाळून बुधवारी रक्षासूत्रासह पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. तुरटीच्या या उपायाने तुम्ही लवकरच कर्जाच्या ओझ्यातून मुक्त व्हाल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *