उत्पन्न वाढविण्यासाठी अधिक मासात करा हा उपाय..

अध्यात्म माहिती

तुम्ही एखादा व्यापार किंवा व्यवसाय करत आहे आणि तो व्यवस्थित चालत नाहीये का? माहित नाही का पण खूप अडचणी येत आहेत किंवा आधी व्यापार खूप चांगला चालत होता पण आता अचानक काही दिवसांपासून व्यवसाय कमी झाला आहे का?

की तुमचा व्यापार पूर्ण बंद पडलाय का? भांडवल असूनही व्यापार होत नाहीये का? अशा जर अडचणी असतील तर आता अधिक मास सध्या सुरू आहे आणि अधिक महिन्यामध्ये एक उपाय तुम्ही नक्की करा. या उपायाचा चांगला अनुभव तुम्हाला येईल.

अनेक वेळा एखाद्याचा व्यवसाय चालत नाही किंवा व्यापार बंद पडतो किंवा त्यामध्ये अडचण येऊ लागतात. आता याला बरीच कारणं असू शकतात आणि खात्री आहे की, ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही केला असेल. पण प्रयत्न करूनही व्यापार म्हणावा तसा चालत नाहीये किंवा तुम्ही गुंतवलेले भांडवल अडकले आणि त्याचा परतावा काही मिळत नाही.

किंवा तुमचा व्यवसाय भागीदारीत आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी येतात. असं सगळं होत असेल तर अधिक महिन्यामध्ये एक साधा उपाय नक्की करून बघा. अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या महिन्यामध्ये भगवान श्रीविष्णूची पूजा केली जाते. जिथे भगवान श्रीविष्णूची मनोभावे पूजा होते ना मग तिथे माता लक्ष्मीचा प्रवेश होतो

आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये माता लक्ष्मीची कृपा मिळावी यासाठी जास्तीत जास्त भगवान श्रीविष्णूची पूजा केली जाते. तुम्ही सुध्दा तुमचा व्यापार वाढावा यासाठी एक उपाय करा तो उपाय असा आहे चला तर जाणून घेऊया.. यासाठी रोज सकाळी लवकर उठायचं. पूजा केल्यानंतर देवासमोर बसून विष्णुसहस्रनाम म्हणायचं.

त्यानंतर तुमच्या घरात पांडुरंगाची मूर्ती असेल तर पांडुरंगाला किंवा घरात असणाऱ्या बाळकृष्णाला तुळशीपत्र बापू एका मंत्राचा 108 वेळा जप करायचा. तो मंत्र या प्रमाणे आहे, “ओम नमो विष्णवे नमः”, या मंत्राचा नियमित रोज तुम्हाला जप करायचा आहे. नक्की काय करायचे ते नीट समजून घ्या सकाळी उठायचं आंघोळ करायची देव पूजा झाल्यानंतर विष्णुसहस्रनाम म्हणायचं आणि ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा.

यामुळे तुम्हाला व्यापारात यश मिळेल. व्यवसायात असलेल्या अडचणी दूर होतील. त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. अधिक मासामध्ये कुठल्याही प्रकारची साधना केली तर त्याचं पुण्यफळ दसपटीने आधीच असतात, म्हणून हा उपाय तुम्ही अधिक मासात केल्यास हा उपाय शीघ्र फलदायी ठरेल.

फक्त हा उपाय करा श्री हरी चरणी पूर्ण श्रद्धा आणि भक्ती असुद्या पूर्ण श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने हा उपाय करा. तुम्हाला तुमच्या व्यवसायात झालेले बदल दिसून येतील. त्याचबरोबर अधिक मासामध्ये अधिक असतात, म्हणूनच लक्ष्मीप्राप्तीसाठी रोज पाच रुपयांचे भाजलेले चणे अर्थात फुटाणे कबुतरांना खायला घाला. या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते.

तुम्हीसुद्धा तुमच्या व्यवसायातल्या अडचणीनी चेंतेत असाल तर पूर्ण अंतकरणाने अधिक मासामध्ये हा उपाय करून बघा, जोपर्यंत अधिक मास सुरू आहे तोपर्यंत हा उपाय करा. निश्चितच तुमच्यावर भगवान श्रीहरी विष्णूची कृपा होईल..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *