वाढदिवसाला मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा केल्याने काय घडते ?

Uncategorized

मित्रांनो आजकाल वाढदिवस करणे म्हणजे जणू काही एक मोठा कार्यक्रम झाले आहे. पूर्वी फक्त वाढदिवस हा फक्त लहान मुलामुलींचा केला जायचा. त्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना स्नान घालून नवीन कपडे घातले जात असत व अवक्षण करून तोंड गोड केले जायचे. आणि त्यानंतर गावातील एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन देवदर्शन केले जायचे.

पण आता तर वाढदिवस म्हणजे सर्व चित्रच बदलले आहे. आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच वाढदिवस साजरे केले जातात. त्यात मोठमोठे केक, बॅनर, मेणबत्त्या, मित्रमंडळी, मेसेजेस, जणू काही वाढदिवशीच्या दिवशी या गोष्टींचा पूर येतो.

परंतु वाढदिवस कसा साजरा करावा?वाढदिवस साजरा करताना कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात, वाढदिवशी काय काय करू नये हि सर्व माहिती आपण आजच्या या लेखात घेणार आहोत. मित्रांनो वाढदिवसाच्या दिवशी नखे आणि केस कापणे, वाहनाने प्रवास, कलह, हिंसकर्म, अभक्षभक्षण, अपेयपान, स्त्रीसंपर्क, या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

मित्रांनो वाढदिवसाच्या दिवशी प्रज्वलित केलेला दिवा विझवू नये. दिव्याच्या ज्योतीची तुलना जिवाच्या शरीरातील पंचप्राणाच्या उर्जेवर चालणाऱ्या स्थूलकार्याशी केली आहे. दिवा विझणे हे जिवाच्या पंचप्राणांचे कार्य संपुष्ठात येऊन जिवाच्या प्राणशक्तीचा र्हास होणे आणि त्याची जीवनज्योत मालवणे याचे प्रतीक आहे.

पेटवलेले दिवा विझवणे हे अचानक होणाऱ्या मृ त्यूशी निगडित असल्याने अशुभ मानले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता देऊ नये. पाश्चत्त्य पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता देतात रात्रीच्या वेळी वातावरणात रजतमकन मोठ्या प्रमाणात असतात.

अशावेळी शुभेच्छा दिल्यास त्या फलद्रुप होत नाहीत आणि हिंदूसंस्कृतीप्रमाणे दिवसाचा आरंभ सूर्योदयालाच होतो. हि वेळ ऋषीमुनींची साधनेची वेळ असल्याने या वेळी वातावरणात मोठ्या प्रमाणात सात्विकता असते. त्यामुळे सूर्योदयानंतर शुभेच्छा दिल्यास त्या फलद्रुप होतात. म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा सूर्योदयानंतरच दयाव्यात.

आधी मेणबत्त्या पेटवून नंतर वाढदिवस साजरा कधीही करू नये. पाश्चत्यपद्धतीचे अंधनुकरून आजकाल बरेचजण मेणबत्त्या पेटवून नंतर त्या विझवून वाढदिवस साजरा करतात. मेणबत्ती हि तमुगुनी असल्याने ती लावल्यास वास्तूत त्रासदायक स्पंदने तयार होतात.

तसेच ज्योत विझवणे तिला हिंदुधर्मात अशुभ मानले आहे. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी मेणबत्ती लावून ती कधीही विझवू नये. आणि केक कापून वाढदिवस कधीच साजरा करू नये. केकवर सूरी फिरवणे हे अशुभ क्रियेचे प्रतीक असल्याने वाढदिवसाच्या शुभ प्रसंगी ती क्रिया केल्याने पुढच्या पिढीवर कुसंस्कार होण्यास सहाय्य्य होते.

अवक्षण झाल्यानंतर आकृष्ट झालेले ईश्वरी चैतन्य ग्रहण कार्याच्या वेळी असे विधीकर्म करणे म्हणजे त्या चैतन्यात त्रासदायक स्पंदनांच्या योगे बाधा आणण्यासारखेच आहे.

कोणत्याही शुभप्रसंगी जाणून बुजून अशाप्रकारचे विधी करणे हे धर्मविधायक प्रवुर्तीचे लक्षण आहे. तर मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि वाढदिवस कशाप्रकारे साजरा करावा याबद्दल. त्याचबरोबर मित्रांनो वाढदिवशी ग्रामदैवताचे दर्शन करावे. मातापित्यांचा आणि वडिलधा-यांचा आशीर्वाद घ्यावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *