वाईट काळातही हे गुपित कोणालाही सांगू नका!

माहिती

मित्रांनो प्रत्येकांच्या वर थोड्या काळासाठी का असेना वाईट वेळ येते वाईट वेळेमध्येच आपल्याला समजून जाते की आपले जवळचे कोण आहेत किंवा परके कोण आहेत आपण आपल्या भावना इतरांना व्यक्त करत असतो म्हणजेच की आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे ती गोष्ट आपण समोरच्याला सांगत असतो.

आपल्याला अडचणी मधून बाहेर पडण्यासाठी समोरचा काही मदत करेल या आशेने आपण त्याला आपल्या सर्व अडचणी सांगत असतो पण असे काही गुपित आहेत ते वाईट काळामध्ये कोणाला सांगायचे नाही तर तुम्ही सांगितलं तर त्याचे दुष्परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहेत तर ते कोणते गुपित आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो आचार्य चाणक्य हे आपल्या नीतीशास्त्रामध्ये असे म्हणतात की जीवन हे चढ-उताराने भरलेले आहे म्हणजेच की जीवनामध्ये कधी चांगले दिवस येतात तर कधी वाईट दिवस येतात पण सर्व दिवसांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे जीवन आहे म्हटल्यानंतर आव्हाने हे येतातच परिस्थिती कोणतीही असू दे त्या परिस्थितीला आपल्याला धैर्याने सामोरे जावे जायचे आहे आणि काही गोष्टी कोणालाही सांगू नये.

आपल्या कितीतरी जवळची व्यक्ती असली तरी देखील त्याला आपल्या काही गोष्टी सांगायच्या नाहीत तुमची व्यथा समस्या सर्वांसमोर मांडणे हे खूप चुकीच आहे म्हणूनच आचार्य चाणक्य असे म्हणतात की जेव्हा व्यवसायात मोठे नुकसान झाले तर सर्वांसमोर दावा करू नये म्हणजेच की सर्वांना त्या गोष्टीची खबर करू नये.

व्यवसाय बद्दल काही अडचणी आहे तुम्ही जर त्या समोरच्याला सांगितला तर ते व्यवसाय मध्ये तुम्हालाच नुकसान होणार आहे जर तुमचा व्यवसाय हा पार्टनरशिप मध्ये असेल तर समोरचा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही अशामुळे तुमचा व्यवसाय खालावु देखील शकतो याच्यामुळे तुमचा आदर देखील कमी होऊ शकतो.

नवरा बायको मध्ये असलेली भांडणे किंवा त्यांच्यामध्ये काही दोष असतील तर ते देखील इतरांसोबत बोलू नये एकमेकांची जर पटत नसेल तर ते आपापसात बोलून अडचणी मिटवायचे आहे जर कुटुंबातील नवरा बायकोचे भांडण झाली तरी याचा पूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतो त्याचबरोबर तुम्ही भांडण आणि न वाढवता संबंध कसे चांगले होतील याचा विचार तुम्हाला करायचा आहे त्यात एकदम महत्वाची गोष्ट म्हणजे

पती-पत्नीमध्ये जी काही भांडणे आहेत ती त्या दोघांमध्ये ठेवायचे आहेत त्या दोघांशिवाय तिसऱ्या व्यक्तीला कळू देखील द्यायचे नाही कितीही रागात ना कितीही भांडण झाली तर एकमेकांबद्दल कधीही वाईट बोलू नये तुमची भांडणे हे कधी ना कधी मिटतातच पण तुम्ही लोकांच्या मनामध्ये जी तुमच्यासाठी प्रतिमा तयार झालेली असते ती तुम्हाला लाजवू देखील शकते.

त्याचबरोबर तुमचे वैवाहिक जीवन हे इतरांसाठी हसण्याचे एकपात्र ठरेल काही कारणाने जर तुमचा अपमान झाला असेल तर याबद्दल देखील तुम्हाला कोणाला सांगायचे नाही आपली लाज आपल्या जवळच ठेवायची आहे जर तुम्ही इतरांना सांगितला तर त्यांच्या नजरेमध्ये तुमची इज्जत कमी होऊन जाणार आहे

आचार्य चाणक्यांच्या मध्ये एखादी व्यक्ती जर वाईट काळाशी संघर्ष करत असेल तर त्यातून ती निघण्यासाठी आचार्य चाणक्यांची अशी काही तत्वे आहेत त्या तत्त्वांचा त्यांनी लाभ घ्यायचा आहे म्हणजेच की त्या तत्त्वांचा ते विचार करून पुढचे पाऊल उचलायचे आहे तुम्हाला किती जरी राग आला असेल किंवा कितीही मोठं अडचणी आल्या असले तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवणे फार गरजेचे आहे काही लोक संकटाच्या वेळी विचलित होतात म्हणजेच की त्यांचा प्रश्न सुटण्याऐवजी जास्त वाढत जातो.

आर्य चाणक्यांच्या मते माणसाला किती जरी अडचणी आल्या तर त्या अडचणीमध्ये संयम ठेवला तरच त्या अडचणीतून तो माणूस लवकरच बाहेर पडणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सकारात्मक विचार ठेवायचे आहे तुमच्यावर किती जरी अडचणी आली तर तुमच्या मनामध्ये एकच गोष्ट असली पाहिजे की या अडचणी मधून मी बाहेर पडणारच कितीही अडचणी पुन्हा येऊ देत मी त्यातून बाहेर पडणारच हे स्वतःला आपण आत्मविश्वास सुद्धा करून द्यायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *