वास्तुदोष दूर करण्यासाठी जाळा ही वस्तू

अध्यात्म वास्तुशास्त्र

प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण तंटे वाद विवाद हे होतच असतात. कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रत्येकाच्या घरामध्ये रोज काही ना काही होत असते. मग तो विषय घरातला असू दे किंवा बाहेरच्या कारणांमुळे पण भांडणेही घरात मध्ये ठरलेलीच असतात. मित्रांनो घरामध्ये सर्व काही चांगले चालत असताना सुद्धा देखील घरामध्ये भांडणे होतातच मतभेद होतात.

एकमेकांचे विचार आपल्याला पटेना असे होतात.घरांमध्ये वास्तुदोष असे देखील आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम असतात. त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे देखील जावे लागते.तर मित्रांनो मी आज तुम्हाला कापूर जळण्याचे काही फायदे व उपाय देखील सांगणार आहे.

कापूर आपण शुभ आहे असे मानतो. त्याच्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. व कापराची अनेक फायदे देखील आहेत.कापूर जाळल्यामुळे घरामध्ये वातावरण आनंदीमुळे होऊन जातो. व कोणत्याही पूजा प्रार्थना करत असताना आपण घरामध्ये आरती झाल्यानंतरनं आपण कापूर हा लावतो.व कापराच्या सुगंधी वासाने वातावरण बदलून जाते.

कापरामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती नाहीशी होऊन जाते. व आनंदमय व शांततामय वातावरण तयार होते. तर मित्रांनो घरामध्ये कोणत्या ठिकाणी व कशामध्ये कापूर जाळल्यामुळे आपले सर्व अडचणी दूर होणार आहे .चला तर आता आपण जाणून घेऊया.

आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर तो आपल्याला दूर करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक दिशेला कापराची वडी ठेवने खूप गरजेचे आहे. असे केल्याने आपल्या घरामधील सर्व वास्तुदोष दूर होऊन जातात. प्रत्येकाच्या घरी सकाळ संध्याकाळी देवाची पूजा केली जाते.व देवाची पूजा करून झाल्यानंतर ना आपल्याला दोन किंवा पाच कापराची वडी रोज सकाळी संध्याकाळ जाळायचे आहे.

असे केल्याने घरातील वातावरण एकदम शुद्ध होते. राहू आणि केतू मुळे घरामध्ये कालसर्प व पितृदोष होतो. हे दोन्ही दोष दूर करण्यासाठी आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ कापराची वडी तुपात भिजवून घरामध्ये धुर करावा. आणि तसेच त्याचबरोबर आपल्याला आपल्या बाथरूम मध्ये व टॉयलेट मध्ये सुद्धा आपल्याला कापराची एक एक वडी ठेवायचे आहेत.

कापराची वडी ठेवल्यामुळे कालसर्प व पितृदोष कायमचा नाहीसा होतो. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजा असू देत किंवा हवन असू दे किंवा यज्ञ कापूर जाळणे हे खूप शुभ मानले गेलेला आहे.कापूर जाळल्यामुळे तिथले वातावरण आणखी देखील मंगलमय होऊन जाते. कापूर जाळल्याशिवाय कोणतीही पूजा विधी हवन यज्ञ पूर्ण होत नाहीत. कापराचे अनेक आध्यात्मिक फायदे देखील आहेत.

कापुर हे सकारात्मक व शांततेचे प्रतीक मानले गेलेले आहे. देवांना प्रसन्न करण्यासाठी देखील घरामध्ये प्रत्येक पूजा झाल्यानंतर कापूर हा जाळावा.याच्यामुळे घरामध्ये सुखमय वातावरण तयार होते. कापूर जाळल्यामुळे कोणतीही राख किंवा कापराची कोणतीही अवशेष राहत नाही. त्याचबरोबर पूजेच्या वेळेस जाळल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा अहंकार पूर्णपणे नाहीसा होऊन जातो.

प्रत्येकाला वाटत असते की आपले वैवाहिक जीवन हे सुखमय व आनंदीमय झाले पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक जण अनेक त्यांच्या प्रतीने प्रयत्न करत असतात. तर तुमचे विवाहित जीवन सुखी होण्यासाठी तुम्हाला घरामध्ये एखादी चांदीची वाटी घ्यायची आहे. किंवा चांदीची कोणतीही वस्तू घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत.

दर आठवड्याला त्याच्यामध्ये एक कोणता तर फिक्स वार करून एक एक कापूर त्याच्यामध्ये वाढवत जायचं आहे.असे केल्याने तुमचे वैवाहिक जीवन आणखीच सुंदर होणार आहे. तुमच्यातील मतभेद सुद्धा दूर होणार आहेत.वास्तुशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की दर शनिवारी कापराचे व तेलाचे काही थेंब टाकून आपल्याला स्नान करायचे आहे.

याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ताजेपणा येतो. आणि व्यक्तीचे सौभाग्य देखील वाढते. वास्तुशास्त्रानुसार कधी स्वयंपाक घरात अन्नाची कमी भासू नये म्हणून रात्री स्वयंपाक घर साफ केल्यानंतर एका चांदीच्या भांड्यामध्ये आपल्याला कापूर आणि लवंग जाळायचे आहे. यामुळे घरामध्ये सुख शांती व समृद्धी नांदते.

कापूर जाळण्याचे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत. तर ती कोणती कारणे आहेत चला तर आता आपण जाणून घेऊया. पहिले म्हणजेच की कापूर जाळल्यामुळे जिवाणू नष्ट होतात. आणि आपल्याला प्रदूषणापासून मुक्ती देखील मिळते. याच्या धुरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या पासून आपण दूर सुद्धा होतो.

जे मी तुम्हाला वरती कापराचे फायदे सांगितले आहे ते तुम्हाला अवश्य करून बगायचे आहेत.त्याच्यामुळे तुम्हाला खूप फरक जाणवणार आहे.व तुमचे आयुष्य व आरोग्य दोन्हीही एकदम चांगले राहणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *