वास्तूशास्त्रानुसार घरातील मंदिरात काडीपेटी का ठेवू नये? जाणून घ्या, यामागचे कारण

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतेच. देवघरांमध्ये विविध प्रकारच्या मुर्त्या देखील असतात आणि घरातील व्यक्ती ही देवपूजा दररोज अगदी नित्यनियमाने मनोभावे करीत असतात. जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर व्हावेत.

परंतु मित्रांनो देवपूजा आपण अशा काही चुका देखील करीत असतो ज्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला अनेक प्रकारची माहिती पाहायला मिळते. म्हणजे कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवावी तसेच कोणत्या दिशेला मंदिर असावे त्यामध्ये ठेवणाऱ्या मूर्ती या कोणत्या दिशेला असावी.

मंदिरात असणारे साहित्य हे कोणते असावे आणि ते कोणत्या दिशेला ठेवावे याविषयी सविस्तर माहिती पाहायला मिळते. तर आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की काडीपेटी देवघरांमध्ये अजिबात ठेवू नये तर यामागचे कारण सांगणार आहे.

काही लोक देवाची पूजा कराताना पूजेचे सामान देवघरातच ठेवतात. ज्याचा आपल्या घरातील इतर गोष्टींवर चुकीचा प्रभाव पडतो. त्यातील एक काडीपेटी. काडीपेटी ही देवघरात आपण ठेवतो पण आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अडचणीत यायला वेळ लागणार नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात पेटलेली माचिसची काडी कधीही टाकू नये.

कारण जर तुम्ही देवघरात काडीपेटी तसेच पेटलेल्या माचिस ची काडी तशीच ठेवली तर यामुळे आपल्याला देवपूजेचे फळ मिळत नाही. देव कधीही आपल्या प्रसन्न होत नाहीत. त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत राहतात. आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे कधीही काडेपेटी देवघरामध्ये ठेवायची नाही.

तसेच घरातील देवतांची मूर्ती किंवा चित्र नेहमी प्रसन्न मुद्रेत असावे. ठेवलेले चित्र किंवा मूर्ती यामध्ये काही अंतर ठेवावे.देवाच्या उग्र रूपाची मूर्ती किंवा चित्र मंदिरात अजिबात ठेवू नका. कारण त्यातून नकारात्मकता येते. मंदिरात ठेवलेल्या पूजेच्या वस्तू नेहमी सजवून ठेवाव्यात. घराच्या मंदिरात जळलेली काळी वात किंवा जळलेली माचिस किंवा सुकलेले फूल कधीही ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मकता येते.

वरील सांगितलेल्या या गोष्टींकडे तुम्ही जर लक्ष दिले आणि त्याप्रमाणे आपले घर आणि घराचे मंदिर ठेवले तर तुमच्या घरामध्ये कधीही वास्तुदोष निर्माण होणार नाही. यामुळे तुम्ही आपल्या घरापासून तुम्ही वास्तुदोष दूर ठेवू शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *