‘या’ दिशेला चुकूनही ठेवू नका डस्टबिन! नाहीतर…..

अध्यात्मिक वास्तुशास्त्र

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती पाहायला मिळते. अलिकडच्या काळामध्ये अनेकजण वास्तुशास्त्राचा सल्ला घेऊनच आपल्या घराची रचना ही करीतच आहेत. जेणेकरून त्याचे दुष्परिणाम आपणाला भोगावे लागू नये. कारण जर असे काही नियम जर आपण वास्तुशास्त्रास संबंधित पाळले नाही तर त्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या घरातील लोकांवर होतो.

तर वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक वस्तूची एक दिशा निश्चित केलेली आहे. कारण या जर योग्य दिशेला तुम्ही आपल्या घरातील वस्तू ठेवली तरी यामुळे आपल्यावर लक्ष्मी कधीच नाराज होणार नाही. तसेच आर्थिक संकटांचा आपल्याला सामना देखील करावा लागणार नाही आणि वास्तुदोष की निर्माण होणार नाही.

तर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये डस्टबिन असते आणि या डस्टबिनची देखील योग्य ती दिशा वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. कारण चुकीच्या दिशेला जर तुम्ही डस्टबिन ठेवले तरी याचे अनेक नकारात्मक परिणाम आपणाला सहन करावे लागतात. चला तर मग जाणून घेऊयात त्यासाठी योग्य दिशा नेमकी कोणती आहे ती.

तर आपल्या वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन हे चुकूनही ईशान्य दिशेला अजिबात ठेवायचे नाही. कारण जर तुम्ही ईशान्य दिशेला डस्टबिन ठेवला तर यामुळे आपल्या घरातील लोकांच्या मानसिक आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जर डस्टबिन हे घराच्या आग्नेय दिशेला ठेवत असाल तर यामुळे आपणाला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

म्हणजेच आपल्याला काही ना काही आर्थिक अडचणी सतत जाणवू लागतात. त्यामुळे तुम्ही चुकूनही आग्नेय दिशेला देखील डस्टबिन अजिबात ठेवायचे नाहीत. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पूर्व आणि उत्तर दिशेला देखील डस्टबिन ठेवायचे नाही. कारण यामुळे आपल्या घरामध्ये नैराश्याचे वातावरण पसरू शकते. तसेच आपल्या हाती घेतलेल्या कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊन त्यामध्ये आपणाला अपयश प्राप्त होऊ शकते.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या दिशेला तुम्ही अजिबात डस्टबिन ठेवायचा नाही. या दिशेव्यतिरिक्त तुम्ही डस्टबिन दिशेला ठेवला तरीही चालते. परंतु चुकूनही वरील सांगितलेल्या या दिशेला अजिबात डस्टबिन ठेवायचा नाही. कारण यामुळे तणावाचे वातावरण आपल्या घरामध्ये पसरते. नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात जाणवते.

त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही आणि सतत काही ना काही अडचणी या येत राहतात. पैशासंबंधी तसेच कामांमध्ये अपयश प्राप्त होऊ शकते. त्यामुळे चुकूनही या दिशेला तुम्ही आपल्या घरातील डस्टबिन ठेवायचे नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *