‘या’ दोन वस्तू वापरा स्वामींची पूजा करताना स्वामींची कृपादृष्टी होईल!

अध्यात्मिक

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त सेवेकरी आहेत आणि स्वामींवर आपला विश्वास देखील असतो की प्रत्येक संकटातून स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात. बाहेर काढतात. त्यामुळे अनेक जण स्वामींची सेवा करण्यामध्ये गुंतून जातात. तसेच आपण स्वामींची सेवा करीत असताना काहीजण स्वामींच्या केंद्रांमध्ये जाऊन विविध प्रकारच्या सेवा करीत असतात. तर काहीजण हे वेळेअभावी आपल्या घरामध्येच स्वामींची सेवा अगदी मनोभावे श्रद्धेने करीत असतात.

स्वामीदेखील आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. भक्तांच्या ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील ही सर्व काही स्वामींची होऊन जातात. तर आज मी तुम्हाला अशा काही दोन वस्तू सांगणार आहे या दोन वस्तू तुम्ही जर स्वामींच्या पूजेमध्ये वापरल्यास तर स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर नक्कीच होणार आहे. साक्षात स्वामी आपणाला दर्शन देखील देतील.

तर तुम्ही स्वामींचे नित्य सेवेकरी असाल, स्वामींचे भक्त असाल जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही या दोन वस्तू नक्कीच वापरायचे आहेत. यामुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. या ज्या दोन वस्तू आहेत या स्वामींच्या अगदी आवडीच्या वस्तू आहेत. त्यामुळे स्वामींच्या पूजेमध्ये या दोन वस्तूंचा वापर तुम्ही अवश्य करायचा आहे.

तर यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे हिना अत्तर. तर स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. तुम्हाला हिना अत्तर हे पूजा सामग्रीच्या दुकानातून सहजतेने मिळून जाईल. तर तुम्ही त्या दुकानांमधून हिना अत्तर खरेदी करून आणायचे आहे आणि स्वामींच्या पूजेमध्ये ते तुम्ही वापरायचे आहे. तसेच स्वामींना अष्टगंध खूपच आवडते. त्यामुळे तुम्ही अष्टगंधाचा टिळा स्वामींच्या कपाळी अवश्य लावायचा आहे.

तर अष्टगंधाचा टिळा स्वामींना लावत असताना तुम्ही पहिल्यांदा आपल्या हातावर अष्टगंध थोडे घ्यायचे आहे आणि त्या अष्टगंधावर तुम्ही एक थेंब हिना अत्तर टाकायचे आहे म्हणजेच अष्टगंध हिना अत्तर मिश्रित अष्टगंधाचा टिळा तुम्ही स्वामींच्या कपाळी लावायचा आहे. बरेच जण हे अष्टगंध लावताना त्यामध्ये पाणी टाकतात तर तुम्ही अष्टगंधामध्ये पाणी न टाकता एक थेंब त्यामध्ये हिना अत्तर टाकायचे आहे आणि तो अष्टगंध हिना अत्तरयुक्त अष्टगंधाचा टिळा स्वामींना तुम्ही लावायचा आहे.

जर तुम्ही स्वामींची दररोज सेवा करत असाल तर तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये हा अष्टगंध हिना अत्तरयुक्त अष्टगंधाचा टिळा तुम्ही स्वामींना अवश्य लावायचा आहे. यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. त्यांचा कृपाशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील आणि तुमच्या सर्व अडचणीतून स्वामी महाराज नक्कीच बाहेर काढतील. तर या दोन वस्तू तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये अवश्य वापरायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *