या गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसा हा खूपच महत्त्वाचा असतो. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तसेच आपल्या जीवनामध्ये पैसा हा लागतोच. त्यामुळे प्रत्येक जण पैसा कमावण्यासाठी दिवस-रात्र काबाडकष्ट करीत असतात. मेहनत घेत असतात.

परंतु मित्रांनो कितीही मेहनत घेतली तरी काही वेळेस आपणाला कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तसेच इतर कामासाठी आपणाला पैसा हा अपुरा पडत जातो. मग त्यावेळेस आपण नशिबाला दोष देत बसतो. आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की जे भरपूर मेहनत देखील न घेता त्यांच्याकडे भरपूर पैसा उपलब्ध असतो व त्यावेळेस आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की ते एवढे कष्ट न करता देखील त्यांच्याकडे भरपूर पैसा उपलब्ध आहे आणि आपण एवढे कष्ट करून देखील आपल्याकडे पैसा का टिकत नाही. आपल्यासारखे पैशासंबंधीत अडचणी का निर्माण होतात.

तर मित्रांनो आपल्या काही अशा चुका देखील असतात ज्यामुळे आपल्याला पैशाची चणचण भासते. म्हणजे या जर चुका आपल्या हातून झाल्या नाहीत तर तुम्हाला देखील पैशासंबंधी कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये भरपूर पैसा उपलब्ध होईल आणि तुम्ही देखील श्रीमंत व्हाल.

तर मित्रांनो तर या नेमक्या चुका आणि आपल्याला कोणत्या गोष्टीचे पालन करायचे आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून मग तुम्ही देखील श्रीमंत व्हाल. तुमच्याकडे पैसा भरपूर उपलब्ध होईल. चला तर मग जाणून घेऊयात या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याचे पालन आपल्याला करायचे आहे ते.

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की, माता लक्ष्मी खूपच चंचल आहे. त्या एका ठिकाणी जास्त दिवस थांबत नाहीत. प्रत्येकाला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा, त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये असे वाटत असते.

तर मित्रांनो माता लक्ष्मीला जर तुमच्या घरांमध्ये टिकवून ठेवायचे असेल म्हणजेच माता लक्ष्मीचा वास तुम्हाला आपल्या घरामध्ये व्हावा असे जर वाटत असेल तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवायचे आहेत. जेणेकरून त्यांचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबीयांवर आपल्या घरावर राहील.

मित्रांनो तुम्हाला जर असे वाटत असेल की माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये व्हावे आणि त्यांचे वास्तव्य देखील आपल्या घरामध्ये असावे तर मी जे तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगणार आहे ते उपाय ते नियम तुम्ही जरूर करून पहा.

तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये धनवृद्धी व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही देवघरात जो दिवा लावता म्हणजेच प्रत्येक जण हा देवपूजा झाल्यानंतर किंवा देवपूजा अगोदर दिवा लावतात. तर त्या दिव्यामध्ये कापसाची वात न लावता लाल धाग्याची वात आपल्याला लावायची आहे.

जर तुम्ही अशा प्रकारचा दिवा जर दररोज आपल्या देवघरांमध्ये प्रज्वलित केला तर यामुळे माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. तर माता लक्ष्मीला लाल रंग आवडतो आणि तुम्ही जर आपल्या देवघरामधील दिव्यामध्ये लाल रंगाची वात जर लावली तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल.

तसेच मित्रांनो प्रत्येक जणच आपल्या घरामध्ये दळण करत असतात. म्हणजे दळण करताना काही आपले जे धान्यांचे बारीक कन राहिलेले असतात म्हणजेच गहू असो, ज्वारी असो त्यातील चे बारीक कण असतात ते आपण मग कचरापेटीमध्ये टाकतो. मग असे अन्न आपल्या घरामध्ये वाया जात असते.

जर तुम्ही अन्नाचा अपमान केला तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीच टिकत नाही. तर अशा वेळेस मित्रांनो ते जे धान्यांचे कण राहिलेले आहे ते कन तुम्ही कचरा पेटीमध्ये न टाकता एखाद्या पक्षाला खाऊ घालावेत.

तसेच मित्रांनो जे आपल्या घरामध्ये अतिथी म्हणजेच पाहुणे येतात त्यांचा देखील तुम्ही मनोभावे आणि आनंदाने आदर सत्कार करायचा आहे. कारण अतिथी देवो भव असे मानले गेलेले आहे. म्हणजेच अशा घरांमध्ये माता लक्ष्मी वास करते जिथे पाहुण्यांचा, अतिथींचा अगदी आनंदाने स्वागत केले जाते.

तसेच मित्रांनो अनेक घरांमध्ये सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी घरातील सदस्य झोपत असतात. जेवण करत असतात किंवा एकमेकांमध्ये वाद-विवाद घालताना दिसतात. तर मित्रांनो अशा घरांमध्ये देखील माता लक्ष्मी थांबत नाही. कारण ही वेळ म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते.

त्यामुळे आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज असले पाहिजे. आपण जर त्यावेळेस आपल्या घरामध्ये झोपलो किंवा जेवण करत असाल किंवा भांडत असाल तर माता लक्ष्मी अशा घरांमध्ये मग प्रवेश करत नाही.

त्यामुळे मित्रांनो सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी आपण कधीही घरांमध्ये झोपायचे नाही किंवा जेवायचे नाही. तसेच सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू ही मारायचे नाही. सूर्यास्त होण्यापूर्वीच आपले घर तुम्ही झाडून स्वच्छ करून घ्यायचे आहे.

तसेच मित्रांनो तिन्ही सांजाच्या वेळी आपल्या घराचा मुख्य जो दरवाजा आहे किंवा मुख्य प्रवेशद्वार आहे ते कायम उघडे ठेवायचे आहे. कारण ही माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते. त्याचबरोबर मुख्य दरवाजाजवळ माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे.

तसेच मित्रांनो झाडूला लक्ष्मी स्वरूप मानले गेलेले आहे. त्यामुळे मित्रांनो झाडूला तुम्ही कधीही लाथा मारू नये. पायाने स्पर्श देखील करायचा नाही. झाडूचे काम झाल्यानंतर तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कुणाची नजर देखील पडणार नाही. झाडू ठेवताना नेहमी आडवा ठेवावा आणि ज्या घरात झाडू नेहमी उभा ठेवला जातो त्या घरातील माझा लक्ष्मी स्थिर राहत नाही असे म्हटले गेलेले आहे.

त्यामुळे मित्रांनो झाडू हा नेहमी आडवा ठेवावा. तसेच मित्रांनो आपले घर हे कायम स्वच्छ ठेवावे. कारण हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अशी एक म्हण आहे. म्हणजेच माता लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ ठेवावे. तसेच मित्रांनो बुधवारी आपणाला कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत.

कारण बुधवारच्या दिवशी जर तुम्ही कुणाला उधार पैसे दिले तर ते पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. म्हणजे ते पैसे बुडतात त्यामुळे चुकूनही तुम्ही बुधवारी कोणाला पैसे उधार द्यायचे नाहीत.

तसेच घरातील महिला स्वयंपाक करते तेव्हा पहिली पोळी गाईला खाऊ घालावी. त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.

तर मित्रांनो अशा या वरीलपैकी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे जर पालन केले तर यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करेल. तसेच घरामध्ये पैशासंबंधी कोणतीही अडचण तुम्हाला निर्माण होणार नाही. आणि तुम्ही एक श्रीमंत व्यक्ती बनाल. तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टीचे नक्कीच पालन करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *