या राशीच्या लोकानी लाल रंगाचा टिळक कधीच लावू नये नक्की जाणून घ्या!

राशिभविष्य वायरल

मित्रांनो आपल्या प्राचीन काळापासून टिळक लावण्याचे महत्त्व आहे. हिंदू धर्मात देवतांच्या चित्रा पासून ते मंदिरापर्यंत टिळकांचा वापर केला जातो. असे मानले जाते की, कपाळावर टिळक लावल्याने शांती आणि ऊर्जा मिळते भारतात अनेक प्रकारचे टिळक लावले जातात. जसे की गोपीचंदनाचा टिळा, सिंदूर, रुई, चंदन आणि भस्माचा टिळा बहुतेक टिळक लाल रंगाचे असतात.

परंतु लाल रंगाचे टिळक प्रत्येक व्यक्तीसाठी शुभ नसतात. असे मानले जाते की टिळक लावल्याने व्यक्तीला मानसिक शांती देखील मिळते. पण असे काही लोक आहेत त्यांच्यासाठी लाल रंगाचे टिळक अशुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या लोकांनी लाल रंगाचे टिळक लावणे शुभ आहे आणि कोणत्या लोकांनी लाल रंगाचे टिळक लावू नये.

मित्रानो लाल रंग हा खुप शुभ मानला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभकार्यात लाल रंगाचे टिळक लावले जाते. लाल रंग हा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि आपण पाहिलं असेलच की देवी लक्ष्मीचा शृंगार सुद्धा लाल रंग असलेल्या वस्तूनीच करतो. लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

मानवी जीवनात लाल रंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याचा परिणाम दिसून येतो. या सोबतच व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांचा विशेष प्रभाव पडतो. लाल रंग मंगळाचे प्रतिनिधित्व करतो आणि मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. जे सामर्थ्य आणि धैर्याचे प्रतीक आहेत. लाल रंग हा सर्व रंगांमध्ये सर्वात शक्तिशाली मानला गेला आहे.

त्यामुळे लाल रंगाचे टिळक लावल्याने मंगळाचा प्रभाव पडतो. हे उत्साह आणि रागाचे प्रतीक देखील मानले जाते. परंतु असे काही लोक आहेत अशा काही राशी आहेत ज्यांनी लाल रंगाचे टिळक कधीच लावू नये. खरे तर आपण सर्वजण पूजेच्या वेळी कपाळावर टिळक लावतो. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा वृश्चिक आणि मेष राशीचा स्वामी मानला जातो. या दोन्ही राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ मानला जातो.

पण या राशीच्या लोकांच्या कुंडलीत जर मंगळ ग्रह दुर्बल ठिकाणी बसला असेल तर या लोकांनी लाल रंगा पासून दूर राहावे. या लोकांना लाल रंग शुभ फळ देत नाही. याशिवाय शनी आणि मंगळ एकमेकांचे शत्रू मानले जातात. शनी लाल रंग आवडत नाही. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी देव मानला जातो.

त्यामुळे या दोन राशींच्या लोकांनी लाल रंगांचा टिळक अजिबात लावू नये. असे मानले जाते की या दोन राशींच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे घातले किंवा टिळक लावले तर शनिदेव त्यांच्यावर कोपू शकतात. म्हणून मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी लाल टिळक लावणे अशुभ मानले गेलेले आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *