या 5 सवयी तुम्हाला गरीब करू शकतात..

अध्यात्मिक माहिती

गरुड पुराणामध्ये अशा पाच सवयी बद्दल सांगितले गेले, त्या सवय जर माणसाला असतील तर माणूस गरिब होतो अर्थात माणसाला आर्थिक समस्या जाणवतात. तर कोणत्या आहेत त्या 5 सवय, तुम्हाला तर नाही ना चला जाणून घेऊ या..
आज आपण गरुड पुराणांत सांगितलेल्या 5 वाईट सवयीबद्दल बोलणार आहोत.

ज्या सवयी व्यक्तीमध्ये असल्या तर ती व्यक्ती कंगाल होते असं म्हटलं जातं. सगळ्यात आधी हे जाणून घ्या की, गरुड पुराण म्हणजे काय? गरुड पुराण हे भगवान श्रीहरी त्यांचे वाहन असणाऱ्या गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचा संकलन आहे. भगवान विष्णूंनी गरुडाला जे ज्ञान दिलं ते ज्ञान या ग्रंथामध्ये आहे.

या पुरणाचे प्रमुख देवता भगवान श्रीहरी आहेत. भक्ती, ज्ञान, शांतता, सदाचार, निस्वार्थ कार्याचा महिमा त्याचबरोबर यज्ञ, दान, तपश्चर्या, तीर्थयात्रा या सगळ्या कर्माबदल सविस्तर माहिती दिली आहे.याशिवाय आयुर्वेद, नीतिशास्त्र इत्यादी विषयांचा वर्णन  सुद्धा करण्यात आले. मृतात्म्यांना शेवटच्या क्षणी करायचा कृतीबद्दल सुधा तपशीलवार वर्णन आहे.

आणि त्यास गरुड पुराण 5 वाईट सवयी सांगितल्या ज्या माणसाला गरीब बनवतात. त्या मध्ये सगळ्यात पहिली सवय म्हणजे घाणेरडे कपडे घालण होय. कारण गरुड पुराणानुसार जर कोणी व्यक्ती सतत घाणेरडे अस्वच्छ कपडे घालत असेल तर माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते तर माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे. म्हणूनच नेहमी स्वच्छ कपडे घालावे.  तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हिताचे ठरते.

दुसरी सवय म्हणजे सतत इतरांचे दोष शोधणे. गरुड पुराणामध्ये सतत इतरांची आलोचना करणाऱ्या, इतरांवर टीका करणाऱ्या इतरांच्या बद्दल वाईट बोलणाऱ्या या व्यक्तींच्या जीवनात दारिद्र्य येते असे सांगितले आहे. विनाकारण आरडाओरडा करणारे, इतरांचं वाईट चिंतणारे, इतरांविषयी वाईट बोलणारी व्यक्ती या सगळ्या व्यक्ती स्वत नुकसान करून घेत असतात.

तिसरी गोष्ट म्हणजे सुर्योदय झाल्यावर झोपणाऱ्या व्यक्ती. गरुड पुराणानुसार जे लोक जास्त वेळ झोपतात ते आळशी असतात, अशा व्यक्ती जीवनात अनेक प्रकारच्या समस्या ओढवून घेत असतात. त्यामुळे आळस करणाऱ्या व्यक्ती या गरीब राहतात किंवा श्रीमंत असल्या तरी गरिबीकडे त्यांची वाटचाल सुरू होते असं करून पकडण्यास सांगितले आहे.

त्यानंतर पुढील सवय म्हणजे पैशाचा दुराअभिमान असणाऱ्या व्यक्ती. गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीला जवळ असलेल्या पैशाचा संपत्तीचा गर्व आहे ती व्यक्ती भौतिक दृष्ट्या कमकुवत असते. अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. मग अशी व्यक्ती गरीब बनते. तसेच पुढील सवय म्हणजे परिश्रम करण्याचा कंटाळा अर्थात आळस.

गरुड पुराणानुसार जर एखादी व्यक्ती कठोर परिश्रमपासून दूर राहत असेल किंवा दिलेला काम नीट करत नसेल तर त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नाराज होते. इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती सुद्धा कमनशिबी असतात, यश त्यांच्यापासून दूर पळते. अश्या व्यक्ती समाजात खूप पाहायला मिळतात. या सवयी पैकी कुठली सवय तुमच्यात असेल तर ती आज दूर करा…

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *