या दोन राशींचे लग्न म्हणजे रोजच भांडणे!!

अध्यात्मिक राशिभविष्य

हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी दोन व्यक्तींच्या कुंडलीत ज्योतिष्यांना दाखवल्या जातात. जन्म कुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह नक्षत्र इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळत असेल तर लग्न केले जाते. पण बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, लग्न करण्यापूर्वी वधू-वरांच्या राशीचे गुण कसे आहेत?

हे सुद्धा पाहायला पाहिजे. कारण ज्योतिष शास्त्रनुसार तुमची रास ही तुमच्या स्वभावातले गुण-दोष ताकद असते. मग अशावेळी जर दोन विरुद्ध स्वभावाचा राशींच्या व्यक्तींचा लग्न झाले तर काय होईल? हे आपण जाणून घेणार आहोत.. चला आता वळू या अशा राशींच्या जोडप्यांकडे ज्यांची लग्न झाली तर त्यांच्यात वादविवाद होऊ शकतात.

1. कर्क आणि सिंह राशी : ज्योतिष शास्त्रानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेळ नाही. कर्क राशीचे लोक हे त्यांच्या जोडीदाराशी जोडलेले असतात आणि त्यांच्याकडून बरेच अपेक्षा ठेवतात. तर सिंह राशीच्या व्यक्ती स्वतंत्र विचारांचे असतात त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते, अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर खरे उतरत नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

2. कुंभ आणि मकर रास: ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ आणि मकर दोघांनाही नात्यांबद्दल चांगली समज आहे. परंतु त्याचा विपरीत स्वभावामुळे बऱ्याचदा त्यांचा एकमेकांशी पटत नाही. मकर राशीचे लोक खूप भावनिक असतात आणि कुंभ राशीचे लोक मात्र प्रत्येक निर्णय व्यवहारिकपणे घेतात. हा फरक यांच्यादरम्यान संघर्षाचे कारण बनु शकतो.

3. वृषभ आणि तुला: ज्योतिष शास्त्रानुसार, या दोन्ही राशीचे लोक अतिशय बुद्धिमान आणि स्वच्छ हृदयाचे असतात. सुरुवातीच्या काळात यांच्यात खूप चांगलं पटते. परंतु दोघांचाही आग्रही स्वभावामुळे हळूहळू ते एकमेकांना आपला पटवण्यासाठी आग्रह करू लागतात आणि यामुळे त्यांच्यात अहंकाराची समस्या निर्माण होते आणि तुम्हाला तर माहितीच आहे की एकदा नात्यात अहंकाराला आला की, नातं कमकुवत होण्याची शक्यता असते.

4. कर्क आणि धनु : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्क आणि धनु राशीच्या व्यक्ती जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाही. कारण धनु राशीच्या लोकांना वेळसोबत आणि वेळेनुसार प्रगती करणं चांगलं माहीत असतं. तर कर्क राशीच्या व्यक्तींवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगायला आवडतं. त्यामुळे या जोडीच्या जीवनात भांडण आणि तणावाची परिस्थिती निर्माण होते.

5. मिथुन आणि कन्या : ज्योतिष शास्त्रानुसार, कन्या आणि मिथुन राशीचे स्थिती कुंभ आणि मकर यांच्यासारखीच आहे. कन्या राशीचे लोक खूप व्यवहारी असतात आणि मिथुन राशीच्या व्यक्ती खूप भावनिक असतात. त्यामुळे दोघांची मते एकमेकांशी जुळत नाहीत आणि त्यांच्यात मतभेद होतात. खूप त्रास झाल्यानंतर जर कधी त्या होण्याचा निर्णय घेतला तर कन्या रास सहजपणे पुढे जाते, पण मिथुन राशीचे लोक अशा परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण जाते.

तर या होत्या त्या राशींच्या जोड्या ज्यांची लग्न झाली तर घरात वाद होऊ शकतात. त्यामुळे ज्यांची लग्न व्हायची आहेत आणि ज्यांच्या ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे ते लग्न करण्याआधी जोडीदाराचा राशीचा विचार करू शकतात.

मात्र, शेवटी पती-पत्नीचे नातं टिकवण्यासाठी गरज असते ती विश्वासाची आणि सामंजस्यापणाची. कारण यामुळे तुम्ही कुठल्याही समस्येवर तोडगा काढू शकता आणि तुमच्या नात्याची वीण घट्ट करू शकता..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *