यंदा महाशिवरात्रीला जुळून आलेत ७ दुर्मिळ योग

राशिभविष्य अध्यात्मिक

यंदाच्या महाशिवरात्रीला सात अद्भुत दुर्मिळ योग जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवशी केली जाणारी उपासना खास असणार आहे. मग कोणते आहेत ते सात दुर्मिळ योग आणि या योगांचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होणार आहे ते जाणून घेऊया.

यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये महाशिवरात्र 18 फेब्रुवारीला साजरी करण्यात येईल आणि यंदाच्या वर्षी माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ 18 फेब्रुवारी 2023 ला रात्री ०८.०३ मि. सुरू होईल आणि माघ वद्य चतुर्दशी समाप्ती १९ फेब्रुवारी २०२३ ला संध्याकाळी ०४.१९ मि. समाप्त होईल. या दिवशी अनेक प्रकारचे दुर्मिळ आणि अद्भुत योग जुळून आले आहेत.

सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळाला निशिथ काल म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण, पुण्य फलदायी असते असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या या निश्चित कालात प्रदोष शिवरात्री व्रत करावं.

या काळात शिवतत्व पृथ्वीवर अवतरीत होत असल्याने निषिथकाल सर्वात प्रभावी मानला जातो. यंदाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 18 फेब्रुवारीला उत्तर रात्री 12.27 मिनिटांपासून ते उत्तर रात्री 01.17 मिनिटांपर्यंत हा निशीत काल असणार आहे.
महाशिवरात्रीला शनी प्रदोष असं सुद्धा अत्यंत शुभ मानले गेले.

महाशिवरात्रीच्या दिवशी शनी प्रदोशामुळे भगवान शिवशंकर मनोकामना लवकर पूर्ण करतात. तसेच शिनीच्या साडेसाती मध्ये जे लोक आहेत त्यांनी महाशिवरात्रीचे शनी प्रदोष व्रत नक्की करावे. त्यामुळे शनीच्या प्रतिकूल प्रभावापासून त्यांना दिलासा मिळू शकेल. सध्या मकर कुंभ मीन या राशींना साडेसाती चालू आहे. त्यांच्यासाठी हे व्रत करणे लाभदायी ठरेल. तसेच कर्क आणि वृश्चिक राशींना शनीची धिय्या चालू आहे त्यांनी सुद्धा या व्रताचा लाभ नक्की घ्यावा.

महाशिवरात्रीला १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ०५.४२ मिनिटांपासून ते 19 फेब्रुवारीच्या सूर्योदयापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा जुळून येत आहे. या योगामध्ये महादेवांचे व्रत करावं आणि व्रताने अपार यश प्राप्त होते. त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग हा धनप्राप्ती व कार्य सिद्धी साठी सुद्धा आहे.

यंदाच्या महाशिवरात्रीला शनी मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान आहे. 13 फेब्रुवारीला सूर्यही कुंभ राशीत प्रवेश करेल. महाशिवरात्रीला पिता पुत्र मानले गेलेले सूर्य एकाच राशीत असतील. ज्योतिष शास्त्रात पिता पुत्र मानले गेलेले सूर्य आणि शनी शत्रु ग्रह मानले जातात असे असूनही या राशीत ते शुभ फलदायी असतील.

मात्र सूर्याचा प्रभाव जास्त राहील आणि आर्थिक बाबींच्या दृष्टीने चांगली मानली जाते. महादेवांची उपासना व्रत आणि उपवास केल्यास शनी दोष दूर होऊ शकेल. या महाशिवरात्रीला गुरु आपले स्वामित्व असलेल्या मीन राशीत आहे आणि मीन राशीतील गुरु ग्रहामुळे हंसराज योगही जुळून येत आहे.

करिअरच्या दृष्टिकोनातून हा योग विशेष मानला जातो आहे. तुम्ही करिअर बाबत जो काही निर्णय घ्याल त्याचा फायदा तुम्हाला होईल. नवीन नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करू शकता. महाशिवरात्रीला गुरू सोबत शुक्रही मीन राशित असेल. ज्योतिष शास्त्रात गुरु आणि शुक्र हे शत्रु ग्रह मानले गेले आहे.

मात्र मीन ही शुक्राची उच्चा रास असल्यामुळे मालव्य नावाचा शुभराज योग जुळून येत आहे. भगवान शिवाची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कामांमध्ये अडचणी येत होत्या तर त्याही दूर होते. मित्रांनो एकंदरीतच या वेळेसची महाशिवरात्र खास आहे.

मग आपण काय करायला हवं या महाशिवरात्रीला आपण जास्तीत जास्त उपासना करायला हवी. भगवान शिव शंकरांच्या नावाचा जप करायला हवा. महादेवांच्या पिंडीला अभिषेक करायला हवा. जेवढी जास्त उपासना या महाशिवरात्रीला तुम्ही करू शकाल तितका जास्त लाभ तुम्हाला होणार आहे. तुमच्यावर महादेवाची कृपा होणार आहे. ओम नमः शिवाय.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *