यावेळी आरशात पाहिल्यास घडेल असे काही… जाणून घ्या काय आहेत संकेत!

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्याचा संबंध आपण जे काही गोष्टी करतो त्याच्याशी जरूर असतो.म्हणजेच आपल्या हातून एखादी जर काही चूक झाली तर त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर दिसून येतोच. तसेच जर आपल्या हातून काही चांगले घडत असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव देखील आपल्या जीवनावर घडत असतो.

बऱ्याच जणांना अशा काही तक्रारी असतात की आम्ही देवाची एवढी भक्ती करतो आणि कष्ट घेतो मेहनत घेतो तरी देखील आम्हाला घरांमध्ये पैसा अपुरा पडतो किंवा कटकटी असतात. आपले घर हे अशांततेत राहते. तर मित्रांनो आपल्या हातून घडणाऱ्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक बदलही घडत असतात.

तर मित्रांनो मी तुम्हाला आज काही अशी माहिती सांगणार आहे की बऱ्याच जणांना आरशामध्ये पाहण्याची खूप जास्त सवय असते. परंतु मित्रांनो आरशात आपण नेमके कधी पहावे याविषयी देखील काही नियम आहेत. जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर ते आपल्यासाठी चांगले असते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला जर तुम्ही या वेळेत जर आरशात पाहिले तर त्याचा काय नेमका संकेत असू शकतो याविषयी माहिती सांगणार आहे.

आरसा आपल्या जीवनातील एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण आरशात बघून स्वतःचे रूप न्याहाळतो व शृंगार करतो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का कि चुकीच्या पद्धतीने आरसा बघितला तर नकारात्मक, दुर्घटना, वाईट घटना इत्यादींचे कारणही ठरू शकते. चला तर पाहुयात कि आरसा कशा पद्धतीने बघू नये. तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपण कधीही जास्त वेळ आरशात बघायचे नाही.

कारण यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता भरपूर प्रमाणात भरली जाऊ शकते आणि मग ते कारण आपल्या नुकसानीचे ठरू शकते. म्हणजेच एखादी वाईट घटना देखील आपल्या बरोबर होऊ शकते.

तसेच मित्रांनो रात्रीच्या वेळी आपण कोणीही आसपास नसताना आरशात अजिबात बघायचे नाही. कारण रात्रीच्या वेळी आरशात नकारात्मकता प्रवेश करते आणि तीच ऊर्जा रात्रीच्या वेळी जर तुम्ही आरशात पाहिले तर आपल्यामध्ये ती नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

यामुळे वाईट शक्तींचे जास्त वास्तव्य असल्याने आपल्याला मग वाईट शक्ती प्रभावित करतात. मग त्यामुळेच मित्रांनो रात्रीच्या वेळी तुम्ही अजिबात आरशामध्ये पहायचे नाही.

तसेच मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपले भाग्य दुर्भाग्यात बदलण्याचे काम देखील हा आरसा करीत असतो. आपण प्रत्येक जण आपला चेहरा उठावदार दिसण्यासाठी आपण आरशाचा वापर करतो. परंतु त्याचे काही वाईट देखील प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो.

आजकाल मित्रांनो आरसे हे प्रत्येक खोलीमध्ये लावण्याची एक फॅशन बनली आहे. परंतु बेडरूममध्ये आरसा कधीही लावू नये. जर लावायचाच असेल तर अशा ठिकाणी लावावा कि सकाळी उठल्या उठल्या आपला चेहरा त्यात दिसू नये.म्हणजेच आपण झोपलेलो असताना आरशात दिसणे खूप अशुभ असते.

असे म्हणतात कि बिछान्याच्या समोर येणाऱ्या अशुभ शक्ती आपल्याला बघत असतात. ते आपल्याला प्रभावितही करू शकतात. तसेच आपल्या अवतीभवती वाईट शक्ती असण्याचा भास ही होऊ शकतो. जे आपल्यासाठी खूपच घातक ठरू शकते. म्हणून शास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा असेल तर त्याला रात्री पडदा बसवून तो झगावा. यामुळे नकारात्मक ऊर्जेची आपणाला भीती राहणार नाही.

मित्रांनो आपल्या घरामध्ये फुटलेला किंवा एखादा तडा गेलेला आरसा ही अजिबात ठेवायचा नाही. कारण आपल्या नुकसानीचे तो कारण बनू शकतो. त्यामुळे फुटलेला आरसा घरात ठेवल्यास एखाद्या भयंकर दुर्घटना देखील होऊ शकते. त्यामुळे आरसा ठेवत असताना तो सुंदर चांगला असावा.

तो फुटलेला किंवा तडा गेलेला अजिबात नसावा. जर फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा असेल तर लगेचच तो तुम्ही फेकून द्यायचा आहे. जर तुम्हाला तुमचे भाग्य चमकवायचे असेल तर सकाळी उठल्या उठल्या कधीही आरसा बघू नये. देवाचे नामस्मरण करीत आपल्या दिवसाची सुरुवात करावी. यामुळे आपल्याला सकारत्मक ऊर्जा मिळते.

आरसा लावताना कधीही उत्तर दिशा,पूर्व दिशा किंवा ईशान्य दिशेला लावणे खूप शुभ असते. यामुळे आपल्या घरात सकारत्मक ऊर्जेचा संचार होतो. वस्तू शास्त्रानुसार गोल किंवा अंडगोल अशा गोलाकारातील आरसा अशुभ मानला जातो. म्हणून चौकोनी किंवा आयताकृती आरशाचाच वापर करावा. घरातील दक्षिण व पश्चिम दिशेला कधीही आरसा लावू नये.

यामुळे आपल्या जीवनात दुःख,त्रास व अडचणी येतात. तसेच मित्रांनो तुम्ही आरशावर कधीही धूळ माती जमा होऊ द्यायची नाही. जर तुम्हाला आपल्या घरातील वास्तुदोष दूर करायचा असेल तर तुम्ही जर घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला टॉयलेट वा बाथरूम बनवलेले असेल तर एक चौकोनी आरसा तेथील पूर्व भिंतीवर लावावा.

तर मित्रांनो अशा प्रकारे वरील प्रमाणे सांगितल्यानुसार तुम्ही यावेळी अजिबात आरशामध्ये पाहायचे नाही. योग्य त्या वेळेलाच आपण आरशांमध्ये पहावयाचे आहे. जर तुम्ही अयोग्य वेळी जर आरशात पाहिल्यास त्याचे नुकसान हे तुम्हालाच होणार आहे. तसेच एखादी दुर्घटना देखील तुमच्या बाबतीत होऊ शकते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *